या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत 22 कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुतीच्या पंते ! देशी, देतोस, समर्पण करिशी. 'ओपणे' हे रूप संस्कृत 'अप' (=देणे) पासून झालेले आहे. 'अर्प हे संस्कृत 'ऋ' (=जाणे) याचे प्रयोजकरूप. प्रभूस नैवेद्य अपिणे ह्मणजे आपल्याजवळ आहे त्यास देवाकडे जावविणे. येथे स्तवनरूप विष वर्णिले आहे म्हणून रूपक समजावें. विष हे हलाहलाहून अधिक गुणी आहे म्हणून व्यतिरेक अलंकार समजावा. हरापेक्षांप्रभुवर अधिक म्हणून व्यतिरेक अलंकार आहे याचे लक्षण:'केनचिद्यत्र धर्मेण द्वयोः संसिद्धसाम्ययोः । भवत्येकतराधिक्यं व्यतिरेकः स उच्यते ॥.' [वाग्भटालंकार-४ परिच्छेद ८४ पृ० ४८.] याचा भावार्थ-जेथें उपमान आणि उपमेय यांतून एकाचे आधिक्य किंवा न्यूनत्व वर्णिलें असतें तेथें व्यतिरेक अलंकार होतो. 'व्यतिरेक विशेष जरी प्रकृताप्रकृतांत वर्णितात कृती, सज्जन उन्नतगिरिपरि परि असती फार कोमलप्रकृति' (अ. वि.). याची अन्य उदाहरणे:-(१) येणे क्षयपात्र अमृतकरहि, कुदशदेह देव मघवाही । आपणचि भारवाही बुडतो बुडवी कुळास अघवाही. ॥ १९ ॥ [वनपर्व-अ० १२.], (२) हा सेनापति घेईल जें जें अर्जुनवधादि मद्यश तें । कैंचा विचार ? भुलतें थोरपणे मन, तसे न मद्यशतें. ॥ ६९ ॥ [उद्योगपर्व-अ० १२]. (३) इकडिल जशी तशी मज तिकडिलहि रथातिरथकथा सांगा । न भल्या दुरुक्ति, देती यापरि हृदयांत न व्यथा सांगा. ॥ ७९ ॥ [उद्योगपर्व-अ० १२], (४) ते पांच त्यांत सावा हा, यावा कोप या न साव्याही । अभिमत तसे न माझ्या जामात्यांसकट मानसा व्याही. ॥ १७ ॥ [उद्योगपर्व-अ० ९], (५) नवपीयूषसमुद्रीं पतन चकोरीसि जरि घडे विधिनें । तदपि अमृतकरचि तयां प्रिय सुख त्यां त्याचियाचि संनिधिने.॥ [मंत्रभागवत-दशमस्कंध ६०६]. पंतकृत केकावलि-(६) कथा सुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती' (५८), (७) सुविद्य धन मेळवी वचन आइके आवरी' (९४), आणि (८) कथा भुवनमोहिनी अशि न मोहिनी होय ती' (१०३) यांतही व्यतिरेक अलंकार आहे. देव स्तुति घेतो आणि तदधिक अमृत देतो, असें वर्णन आहे म्हणून या चतुर्थ चरणांत अधि-- कपरिवृत्ति नामक अलंकार झाला आहे. [मागें केका १५, पृ० ४६ टीप २ पहा.] _१. कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुतीच्या पते ! (देवा!) भले [जन] स्तुतिप्रति न वरिती, ते [जन] पाप न जोडिती. तव गुणैकदेशभ्रमें ज्यांचिया गळां [ती स्तुति] पडति, तिहीं तुजचि दावितां बा! |देवा] तुला संभ्रमें भजति-असा अन्वय. कवीश्वर याचा अर्थः-वेदांत ऋषि आपणास 'कवि,' व वेदसूक्तांस 'काव्य' अथवा 'कविता' म्हणत. ऋग्वेद मंडल १ सूक्त ७२ मंत्र १, मंडल २ सूक्त २३ मंत्र १ ('गणानां त्वा') पहा. म्हणून कवीश्वर म्हणजे शक्तिपुत्र पराशर, रहुगणपुत्र गोतम, घोरपुत्र कण्व, विश्वामित्र, वसिष्ठ, भरद्वाज, भृगु कुत्स, कश्यप इत्यादि वैदिक ऋपि किंवा नारद, व्यास, वाल्मीक्यादि पौराणिक ऋषि असा । समजावा. स्तुति विषासारखी दुःसह असतांही देव तिला गोड मानतो आणि ती देवाचे सेवन करिते अशा अभिप्रायाने स्तुतीस क्षीरोदधिकन्येची उपमा देऊन देवाकडे ) व संबोधून कवि म्हणतात. कवि+ईश्वर (श्रेष्ठ कवि, व्यासवाल्मिकादि)+ मनस+पयोनिधि घ (क्षीरसमुद्र) सुता (त्याची जी कन्या लक्ष्मी) [तद्रूपाजी स्तुति, तिच पातत्व