या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. ८७ तिच्या पते ! येथे कविवरांच्या मनास पंतांनी क्षीरसमुद्राची उपमा देऊन स्तुतीला लक्ष्मीरूपिणी केली आहे, म्हणून हा रूपकालंकार जाणावा. याची काही उदाहरणे:-कृष्ण कर्णवधानंतर धर्मराजास गौरवितात. (१) 'तुमची आज्ञा देवी निजहस्तगतार्जुनायुधे आजी । कर्णमहिष मारुनियां विजयातें पावली रणामाजी ॥१९॥ (२) त्वां इंद्रे प्रेरितसितवाहाशनिनें वृषाद्रिचे पिष्ट । केले हे यश देवा! गातील तुझें सदा महाशिष्ट ॥ २० ॥ (३) तूं नरसिंह महात्मा, बीभत्सु तुझा नखप्रकर देवा! । वृष कनककशिपु, महिमा प्र-हाद तुझीच ज्या रुचो सेवा ॥२१॥ (४) तूं रुद्र, तुझें तिसरे लोचन हे बंधुरन, वृष काम । तूं राम, कर्ण हा भव, अर्जुन भुजतेज हे तुझें नाम' ॥ २२ ॥ (कर्णपर्व अ० ५०), (५) 'तव यश मानस, सद्गुण पद्म, सुकवि राजहंस, मी अलिसा' (कृष्णप्रार्थना २३), (६) 'दुर्योधन परमेश्वर वाटे, तो वीरभद्र कर्णबळी, । धर्महि दक्ष, समर मख' ऋत्विज पांचाळ, होय उग्र कळी' ॥ (कर्ण. १४-७४.) [मागें केका ६, पृ० १८,१९ टीपा पहा.] मनोरूप पयोनिधि हा अनुभयताप्य रूपकालंकार होय. उपमेंतील सरसताः-कविश्रेष्ठांच्या पनास सागरोपमा दिली आहे ती फार सरस व समर्पक आहे. समुद्राचे आणि कवींच्या मनाचे गाधत्व, चंचलत्व, अपारत्व व गंभीरत्व या गुणांत सादृश्य (साधर्म्य) वर्णन करण्याजोगे आहे. सागराच्या ठायीं तरंग आणि मनाच्या ठायीं तर्क यांच्या चांचल्याने प्रतीयमान होणारे सादृश्य तर फार मनोहर आहे. स्तुतीचे मनोजनकत्व आणि लक्ष्मीचे क्षीराब्धिजनकत्व वर्जून स्तुति आणि लक्ष्मी यांचा उपमेयोपमाभाव साधिला आहे तो तर साहित्यशास्त्रज्ञांस क्षणभर रिझविल्यावांचून राहणारा नाही. कवीचें मन कल्पनामय असल्यामुळे ते फार चंचल असते. सत्कवींच्या मनांचा थांग लागणे किती कठीण आहे हे सत्काव्यवाचकांस सांगणे नकोच. सुरस व विचित्र कल्पना प्रसवण्याची शक्ति सत्कवीच्या प्रतिभारमणीचा एक बहुमोल गुण आहे ही गोष्ट मोरोपंताला चांगली अवगत होती ह्याविषयी प्रमाण-'बहु कल्पना सुकविसा, विजयहि बहु शरपरंपरा व्याला' (विराट ५-२७). यावरून कवींच्या मनाचे अगाधत्व, अपारत्व व चांचल्य हे गुण प्रकट होतात. आधींच मन-मग ते कोणाचें असेना-चंचल, त्यांत कवीचें मन तर फारच चंचल. एका क्षणांत पृथ्वीवर तर दुसऱ्या क्षणांत स्वर्गात असावयाचे. ह्याविषयी महाकवि शेक्सपीयर याच्या ग्रंथांतील पुढील उतारा वाचनीय आणि सुसेव्य आहे: The Poet's eye, in a fine frenzy rolling, Doth glance from heaven to earth, from earth to heaven - And, as imagination bodies forth The forms of things unknown, the poet's pen Turns them to shapes, and gives to airy nothing A local habitation, and a name :या उताऱ्यांतील सहा ओळींचें पद्यात्मक भाषांतर कै० कृष्णाजी परशुराम गाडगीळ यांनी 'संसारसुख' नामक पुस्तकांत केले आहे ते असें:-'कवींसि होतां काव्यस्फूर्ति, । प्रसन्न दृष्टीने देखिती । आकाश तैशी ही क्षिती, । वारंवार सप्रेमें ॥ १॥ अमूर्त तरंग जे उठति मनीं । तयां प्रसादेंकरूनी । मूर्तिमंत करिती कवनी, । नाम, स्थळही देती त्यां.' ॥ २ ॥ संसारमा -काव्य-पृ० २५३.] २. वल्लभा! स्वामिन् ! परमेश्वर कविश्रेष्ठांच्या सताना