या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. गळां पैडति ज्यांचिया तव गुणैकदेशभ्रमें, तिहीं तुजचि दावितां, भंजति बा! तुला संभ्रमें. ॥ ३२ स्तुतीचा स्वीकार करून पापांत पडत नाहीत. ४. पातक. भले पुरुष जननीरूपिणी स्तुतीचा अंगीकार करून पापाचें गांठोडें पदरी बांधीत नाहीत. १. गळ्यांत. 'गळां' यांत 'आं' हा सप्तमीचा प्रत्यय आहे. हा अकारान्त आणि आकारान्त पुल्लिंगी नामास मात्र लागतोः-(१) पायां पडला. (२) गळां पडला. (३) अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ । त्याचे गळां माळ असो नसो. [तुकाराम.] (४) पडलों तुझियाचि गळां की येशी तूंचि संकटी कामा. [मोरोपंत-नामरसायन-५६], (५) विराटपर्व-अ०३ गी० ११७, (६) उद्योगपर्व-अ० १३ गी० १२१; (७) [एकनाथस्तव-गी० २ पृ० १९.] भले स्वतः स्तुतीचा स्वीकार करीत नाहीत, तथापि एखादे वेळेस ती स्वतः होऊन कोणा सत्पुरुषाच्या गळी पडते, त्याचे कारण तिसऱ्या चरणांत दिले आहे. २. 'गळां पडणे' यांत लोकोक्ति अलंकार आहे. 'जरि करिति लोकवादानुकरण कवि म्हणति तीस लोकोक्ति । साही कांहीं महिने गे सखये मिटुनि नेत्रपुटशुक्ति ॥' (अ.वि.) जेथे एखाद्या लोकप्रसिद्ध उक्तीचे अनुकरण केलें असतें तेथें लोकोक्ति अलंकार होतो. गळां पडति-या पदाने स्तुतीचा निर्लज्जारूप दोष आणि गाचार सुचविला आहे. ३. तव (भगवंताचा)+ गुण (दयाक्षमाशांत्यादि गुण)+एकदेश (कांहीं अंश)+भ्रम (मोह) त्याच्याने. परमेश्वराचे गुणांचा कांहीं अंश स्तुतीला सत्पुरुषांच्या ठिकाणी दिसून येऊन त्यामुळे झालेल्या भ्रमानें; भगवद्गुणांपैकी काहींचे वास्तव्य साधुपुरुषांत दिसून येऊन हाच माझा पति असा स्तुतीला भ्रम होऊन ती प्रथम त्यांच्या गळ्यांत पडते. समर्पक शब्दयोजनाः-आपली स्तुति कोणी करूं नये, आपण पापराशी असल्यामुळे स्तुतीस केवळ अपात्र असें ज्या साधूंना वाटते ते नको नको म्हणत असतां इतर लोक त्यांची स्तुति करितात हा अर्थ गळां पडति' ह्या पदाने सुचविला आहे. 'दया' क्षमा, शांति । तेथें देवाची वसति॥' असा तुकारामाचा अभंग आहे. ४. त्यांनी, साधूंनी. ५. दाखवून दिले असतां. ६. भजते, तुझी सेवा करिते. ७. मोठ्या आदराने. संभ्रम आदर. 'संभ्रमः साध्वसेऽपि स्यात्संवेगादरयोरपि., 'ती स्तुतिरूप स्वयंवरा कन्या वरातुरा होत्साती कोणाही पुरुषामध्ये तया न यत्किंचित् अंश पाहिला, म्हणजे त्या गुणाने वेडी होऊन त्याच्या गळां पडूं लागते, तेव्हां ते सत्पुरुष तिला सांगतात की ज्या आमच्या सौंदर्योदार्यादि कोणत्याही गुणाला तूं मोहित झाली असशील, तो गुण वस्तुतः आमचा नाही, तो गुण पूर्णत्वे ज्या भगवंताच्या गायीं नांदतो त्याकडे जा, म्हणजे तो तुझा अंगीकार करील, असे जेव्हां ते तीस सांगतात, तेव्हां ती लागलीच तुजकडेस वळून तुला शरण येते. येथे कवीने स्तती आतुर्यादि लक्षण साधून तिच्या विगर्हितत्वाचे यथास्थित समर्थन केले आहे. नन सत्पुरुषाचा स्वस्तुतिविषयक अनादर साधून भगवंताचे सर्वगुणाधिष्ठातृत्वहि साधित आहे. आणखी सद्गुणी साधुपुरुष परमेश्वराच्या विभूति आहेत असाही या केकेंत आपला भावार्थ सुचविला आहे.' (य० पी०-पृ० १३९-१४०.) या केकेंतील वर्णन फार सरस आहे