या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MIS-M4 अक १० वा. अक्टोबर १८९८. २२७ उल्हासवृत्तीने दिली. आणि ह्मणाली, " बाबा ! तुझ्यापाशीं माझें एक मात्र मागणे आहे, ते एवढेच की, 'एक घाव दोन तुकडे ' कर." नंतर तिने आपल्या हातरुमालाने डोळे बांधले, आणि जवळच्या एकाला 'कृपा करून मला वधस्थानी नेऊन पोंचवा' ह्मणाली. त्याने तिला तेथे नेल्यावर तिने त्या फळीवर आपले मस्तक आडवें ठेविले. आणि मोठ्याने दीन स्वर काढून ह्मणाली, “जगदीश्वरा! माझा आत्मा मी तुला अर्पण केला आहे !!!" झाले. डोळ्याचे पातें लवते न लवतें तो कु-हाडीचा घाव पडला. आणि सारा कारभार आटपून सामसूम झाले ! जमलेल्या यच्चयावत् मंडळीच्या तोंडावर प्रेतकळा दिसू लागली, व जो तो, हळहळत, अश्रु ढाळीत, व डोळे पुसीत आपआपल्या स्थानी निघून गेला, आणि इतिहासांतील हदयदावक गोष्टींमध्ये लेडी जेन ग्रेची गोष्ट प्रधानत्वेकरून चिरंजीव झाली. साखरेची बाहुली. ये बाळा ! चिमण्या असा जवळ तूं, ये बैस येथे जग खाऊ घे बह गोड चाखुनि पहा, हा लागतो कां बरा । प्रेमें ठेव जपून फार नियमें, घालून पाहे मखीं ह्याची आवड लागली तर तुला, देईन मी आणखी ॥१॥ चित्रे साखर घालुनी बनविली, ये ये दुकानी पहार बाळा ही दिसतात सुंदर किता, आनंददायी अदा । हा हत्ती, रमणीय झाड बघ हे, हा मोर ही बाबी मल्लांची, दिसते किती तरी पहा, झोंबी मजेची भली ॥२॥ उचलुनि जवळी घे, चित्र एकेक हातीं वरिवरि निरखोनी, आवडीन पहा तीं। तुजसि सकल चित्रे, वाटती रम्य का हीं ? हळु हळु तरि नांवें, सांगतो ऐक कांहीं ॥ ३ ॥