या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १८९८. १०१ मलबारवर्णन. कोची येथील तिरुमल देवस्थानाचे हायस्कूल. मातेव रक्षति पितेव हिते नियुक्त कांतेव चाभिरमयत्यपनीय खेदम् । लक्ष्मी तनोति वितनोति च दिक्षु कीर्ति किं किं न साधयति कल्पलतेव विद्या ॥ १ ॥ पुण्यपत्तनासारख्या विद्यापीठांत, व सुशिक्षित समाजांत 'न्यू इ. ग्लिश स्कूलासारख्या, किंवा 'फर्ग्युसन कॉलेजासारख्या संस्था व्यवस्थित रीतीने चालल्या, तर त्यांत मोठेसें नवल नाही. परतु म लबारासारख्या परकीयस्थळी, मागसलेल्या एका जातीने अशा संस्था चालविणे, आणि साहेबलोकांना सुद्धां, जिची तरतरी पाहून ताड़ा बोट घालावयास लावणे, ही गोष्ट सामान्य नव्हे, तर खरोखरच तारा करण्यासारखी व धन्यवाद गाण्यासारखीच आहे. कोचीमध्ये जी लोकसंख्या आहे, तींत गौडसारखत-किंवा काकणी लोक ह्मणून ज्यांस ह्मणतात, त्यांचा भरणा विशेष आहे. हे लाक सुमारें पांचशे वर्षांपूर्वी, गोमांतकांत पोर्तुगीज लोकांनी राज्यक्रांति करून बलात्काराने लोकांस धर्मभ्रष्ट करूं लागले, त्या वेळेस छळाला त्रासून कोची सरकारच्या आश्रयास येऊन राहिले. तेव्हां अर्थातच ह्यांची जन्मभाषा मराठी आहे. पण ती अगदींच प्राचीन आहे. हल्लीच्या गोमांतकांतील भाषेहून ही फार भिन्न. तिला व्याकरण वगैरे कांहींएक नाही. केवळ नामशेष मात्र राहिली आहे. पुण्यांतील ए. खाद्या गृहस्थाने एक वाक्य ऐकिलें तरी, तोंडाकडेच बघण्याची पाळी यावयाची ! ह्मणजे गोमांतकांतील भाषा ही, महाराष्ट्रदेश जवळ असल्याने कांहींशी सुधरली आहे. आणि ही प्रथमपासून असंस्कृतच राहिलेली आहे. तरी तिच्यांत ज्ञानेश्वरीपैकी पुष्कळ शब्द व रूपे आढळतात.

  • मातेप्रमाणे संरक्षण करते; पित्याप्रमाणे हित कथन करते; पत्नीप्रमाणे दुःख हरण करून मनाला रमविते; द्रव्य देते; दाही दिशांला कीर्ति पसरते; अशी ही विद्या, कल्पवल्लरीप्रमाणे कायकाय ह्मणून देत नाही ?