या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. हे कोंकणीलोक, कोचीत येऊन स्थाईक झाल्यानंतर, त्यांनी आपल्या अश्रांत श्रमानें व व्यवहारचातुर्याने चांगला पैसा संपादन करून संपन्न बनले. व त्यांनी कोची येथे श्रीव्यंकटेशाचे ऊर्फ बालाजीचे देवस्थान स्थापन केले. ह्यासच 'तिरुमल देवसम्' असें ह्मणतात. 'तिरुमल' हे 'श्रीमत्' ह्याचे रूपांतर आहे. मलबारी भाषेमध्ये 'श्री' च्या ऐवजा तिरु' ह्मणतात, आणि 'मत' प्रत्ययाचा उच्चार नेहमी 'मल' असा करतात. 'देवसम् ' झणजे देवस्थान. तेव्हां अर्थातच 'तिरुमल वसम्' ह्याचा अर्थ 'श्रीमान देवस्थान' असा आहे. हे देवस्थान ह्मणजे एक लहानसें राज्यच असून तेथील कारभार एखाद्या राज्य पद्धताप्रमाणच चालतो. शिवाय देवाची गंगाजळीही चांगली संतोष आहे. चार हजारांची नुसती घांट आहे. देवालय बांधण्याचे अध झाले आहे; त्यासच दोन कोटि रुपये खर्च होऊन गेला. शिखराला सुवर्णाचे नऊ कळस, सबंध पाचेचा कोरलेला तांब्या; एकलक्ष रुपयांचा सोन्याचा गरुड लक्षावधि रुपये भांडारात इत्यादि वरून येथील संपत्तीची बरीच कल्पना मनांत येण्यासारखा भारत देवस्थानचा विस्तत व मनोरंजक इतिहास पूर्वी केरळकोकिळामच्या आहे. व त्यांत ह्यासंबंधी बरीच माहिती आलेली आहे. तेव्हां अधिक सांगत बसण्याचे कारण नाही. या दवालयाचे काम चालविण्यास अष्टाधिकारी आहेत. त्यांत श्रीमत रा. रा. हरी शनै हे एक मख्य आहेत. त्यांच्याच तंत्राने सर्व कार चालता. शनै ह्यांस उच्च प्रतीचे शिक्षण मिळालेले नाही, तथापि त समजस, सुखभावी व शांत वृत्तीचे आहेत. त्यांच्या हाताखाली रा. रा. नरशिग प्रभु हे देवस्थानचे म्यानेजर आहेत. हे आपल्या कामात फार दक्ष असून समाजाच्या उन्नतीकडे ह्यांचे फारच लक्ष्य असते. ह्यांना महाराष्ट्र आणि मलबारी ह्या दोन भाषा उत्तम प्रकारे अवगत असून कायदेकानूतही हे मोठे वाकबगार आहेत. ह्मणजे एकंदरीत चतुरस्रता, कारस्थानपणा आणि समाजाची कळकळ, हे सर्वमान्य गुण त्यांच्या अंगीं वसत आहेत. तसेंच रा. रा. जोग पै, वकील ह्मणून एक मोठे सुशील व सत्वस्थ गृहस्थ आहेत. हे इंग्रजी भाषानिपुण असून आपले काम उत्तम रीतीने चालवितात.