या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वाः मे १८९८. १०३ ह्या वरील त्रिवर्गाच्या मनांत प्रथमतः अशी कल्पना आली की, आझी जातीने ब्राह्मण असून आमच्या जातीला दिवसेंदिवस अशी दशा प्राप्त झाली आहे की, कित्येक विपदस्त लोक हमालीचे काम करून तांदळाचे मुडे, गवताचे भारे व लांकडांची ओझी सुद्धा वाहतात, ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. हा सर्व परिणाम आपली जात, विद्येच्या कामी मागसल्याचा आहे. ह्यासाठी आपल्या जातींत शिक्षणाचा प्रसार, व विद्येचें दान अगोदर झाले पाहिजे. देवस्थानांतून निरंतर यथेच्छ अन्नदान देऊन सहस्रावधि ब्राह्मणांचा समुदाय पोसला जातो, पण विद्यादानाकडे कोणीच लक्ष्य पुरवीत नाही, हे ठीक नाही. हा विचार मनांत आणून अशा प्रकारचे एक 'ऑग्लोव्हाक्युलर' स्कूल आपल्या विशिष्ट जातीकरितां स्थापन करावें, अशा विचारास लागले. ह्या लोकोपयोगी कार्याला देवस्थानांतून मदत होईल हे खरे; पण त्यास फंडाचेही सहाय पाहिजे. तेव्हां फंड जमा करणे हीच काय ती मोठी गोष्ट. जे लोक विद्यंत मागसलेले असतात, त्यांस विद्येची अभिरुचि नसते. ते धर्मभोळेपणाने ह्मणा किंवा चैनीखातर ह्मणा-भलत्याच कामाकडे हजारों रुपये उधळून टाकतील, पण शिक्षणप्रसारासारख्या सत्कार्याकडे एक दमडी खर्च करावयाचे नाहींत. तेव्हां अशा लोकांची मने वळविण्याचे काम किती चतुराईचे आहे हे सांगणे नकोच. परंतु ह्या त्रिवर्ग सद्गृहस्थांनी महत्प्रयासाने तेंही काम तडीस नेऊन फंड उभारला, आणि लहानशी शाळा, एका लहानशा इमारतींत सुरू केली; व रा. रा. जोग पै ह्यांस तिचे म्यानेजर नेमले. हे गृहस्थ त्या संस्थेचे बाल्यावस्थेतील कामही. आपले काम सांभाळून व्यवस्थित रीतीने व परोपकारबुद्धीने पहात असत. र अशा रीतीने सारस्वतांनी प्रथमतः सरखतीरूप कल्पवृक्षाचे बीजारोपण केले. त्यास आजमितीस सुमारे पांच सहा वर्षे झाली. तो उत्तरोत्तर जोमास लागून त्यास कोमल पालवी फुहूं लागली. व ह्या वर्षात तर त्यास फुलोरा येऊन मोहर गजबरला आहे. त्याच्या शीतल छायेचा उपयोग अनेक लोक घेत आहेत; व त्याचा कीर्तिसुगंध दशदिशांला भरत चालला आहे. कोणत्याही संस्थेची स्थापना सुमुहूर्तावर झाली, मणजे तिला अनुकूल असे योगायोग आपोआप जुळून येतात. त्या