या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. प्रमाणेच ह्या शाळेची गोष्ट झाली. प्रथमतः ही शाळा एका लहानशाच इमारतींत असून तींत सुमारे शंभराच्या अदमासाने मुलें असत, व चारपांचच शिक्षक असत; व तेही सामान्यच इंग्रजी ज्ञानाचे असत. मागच्या वर्षी डाक्टर अप्पाराव ह्या नांवाचे त्यांच्याच जातीचे एक विद्वान् गृहस्थ कलिकोटाहून कोचीस खासगी डिस्पेन्सरी काढावी ह्या उद्देशाने आले. त्यांची हुषारी व तरतरी पाहून श्री. हरी शनै व नरशिंग प्रमु ह्यानी 'आपण आपले वैद्यकीय काम सांभाळन आमच्या देवस्थानच्या शाळेच्या व्यवस्थेचे काम सांभाळावें' ह्मणून विनात कला. विनात त्यानी मोठ्या आनंदाने मान्य करून ते काम पहावयास लागले. मिस्तर अप्पाराव हे ह्या शाळेचे म्यानेजर झाल्यापासून तिचे स्वरूप अगदाच बदलून गेले. ज्या शाळेत पूर्वी शंभर मुले होती, त्याच शाकत मुलाचा नंबर हल्ली २९१ झणजे तीनशेच्या जवळ जवळ झाला आहे, ज्या शाळेत पूर्वी अवघे तीन चार शिक्षक होते, तेथें आतां शक्षक आहेत. त्यांपैकी ४ म्याटिक्यलेशनच्या वरचे झणजे एफ. ए... इंटरमिजियट अशांपैकी आहेत. पांच म्याट्रिक्युलेट आहत, १ व त्याच्या खालचे आहेत. न्यू इंग्लिश स्कुलाप्रमाणेच येथील अ माठा झपाट्याने चालत आहे. ह्या शाळेला सुमारे २५००० रुपये खचून फार सुरेख इमारत बांधली आहे, व तींत क्लासांना योग्य अशा सोयी केल्या आहेत. हेड मास्तर, व म्यानेजर ह्यांच्यासाठी प्राचव्हट रूम्स केलेल्या आहेत. रसायनशास्त्र शिकविण्यासाठी हजार पधराश रुपयांची ऑपरेटस, केमिकल्स वगैरे आणवून ठेवली आहेत. लायब्ररीत सुमारे आठशे रुपयांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. शिवाय मुलांकरितां पशुसंग्रहाची चित्रे, नकाशे, ड्रॉइंगचे मॉडेल्स वगैरे विपुल सामानाचा संग्रह केलेला आहे. कपाटें, बांके, खुा, फळे, टेबलें वगैरे सामान उत्तम प्रतीच्या सागवानाचे असून सुरेख मांडलेले असते. शाळेचे किरकोळ काम करण्यासाठी तीन शिपायी ठेवलेले आहेत. डाक्टर अप्पाराव हे म्यानेजरचे काम पाहून शिवाय रसायनशास्त्र शिकवितात, व इतर मास्तर बाकीचे विषय शिकवितात. ड्रॉइंग शि. कविण्याचे काम हेड मास्तर करतात. अप्पारावांनी घालून दिलेले नि