या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ वा. मे १८९८. यम फारच पद्धतवार आहेत. त्यामुळे एकंदर शाळेची शिस्त फार उत्तम दिसते. प्रत्येक शिक्षक आपआपले काम फार काळजीने करीत असतो. मिस्तर रंगाप्पा शनै हे हेड मास्तरच्या जागी आहेत. हेही मोठे चलाख, मेहनती व हुषार आहेत. शाळेतील एकंदर टापटीप विशेष तारीफ करण्यासारखी असते. कोठे मलिनपणा, अव्यवस्थितपणा, असभ्यता वगैरे बिलकुल दृष्टीस पडत नाही. तालीम करण्याची, क्रिकेट, ल्यांटेनीस वगैरे खेळण्याची सोय लगतच केलेली आहे, व ती विशेष सोयीकर करण्याचाही लौकरच विचार आहे. ह्मणजे एकंदरीत ह्या शाळेतील किंवा हायस्कुलांतील व्यवस्था व अभ्यास ब्रिटिश राज्यांतील सरकारी हायस्कुलाप्रमाणे बरोबर, किंवा त्याहून कांकणभर अधिक व्यवस्थित चालला आहे. ह्मणून त्याबद्दल अभिमान व भूषण वाटणे हे अगदी साहजिकच आहे. प्रस्तुत विद्यालयांत आमच्या मताने एक मात्र उणीव आहे. ती ही की, ह्या सारखत जातीची जन्मभाषा मराठी असून, तिच्यांतील एक शुद्ध वाक्य त्यांस बोलतां येऊं नये, व कळू नये, व त्या भाषेत अपरंपार ग्रंथसंग्रह भरलेला असता, त्यांतील रसास्वाद यत्किचित्ही त्यांस चाखावयाचे सामर्थ्य असूं नये ही अत्यंत दिलगिरीची गोष्ट आहे. मोरोपंत, वामन, रामदास, तुकाराम, ह्यांची किंवा त्यांच्या अद्भत काव्यचातुर्याची त्यांस कल्पनाही नाही. प्रस्तुतकाली त्यांच्या खभाषेची स्थिति ह्मणजे 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या' अशापैकीच आहे. इंग्रजी भाषेमध्ये कितीही आपले मनुष्य प्रवीण झाले, तरी ती त्यांस जन्मभाषेप्रमाणे येणे दुरापास्तच होय. मलबारी भाषा ही परकी असून शिवाय अपुर्ती; आणि जन्मभाषा जी त्यांची मराठी, तिचा आणि त्यांचा छत्तिसाचा आंकडा! तेव्हां त्यांस सहजच 'धड ऐल तीर ना पैलतीर' असे होऊन गेले आहे. त्यांस जर एक वेळ महाराष्ट्र कवींच्या काव्यामृताची गोडी लावून दिली, तर ते हांहां ह्मणतां त्यांत प्रवीण होतील; आणि इतकें करण्याला फारसे श्रमही नकोत. शाळेत शुद्ध महाराष्ट्र भाषेचें प्रत्यही तास किंवा दोन तास शिक्षण दिले झणजे रग्गड होईल. श्री. रा. हरी शनै, व रा. रा. नरशिंग प्रभु ह्यांच्या मनांत हा विचार पूर्वीपासून असल्याचे आझांस माहित आहे. मग तो १४