या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. हल्लीच कां मागं पडला समजत नाही. हल्लींचे म्यानेजर डाक्टर अप्पाराव तरी ह्या गोष्टीचा नीट विचार करून महाराष्ट्र भाषेवर कृपा करतील अशी दृढतर आशा आहे. या का असो. ह्या हायस्कुलचा वार्षिक बक्षिससमारंभ गेल्या मे महिन्याच्या ३० तारखेस मोठ्या थाटाने झाला. नामदार जे. डी. रीस, सी. एस्. त्रावणकोर व कोचीचे रेसिडेंट ह्यांनी अध्यक्षस्थान सुशोभित करून खहस्ते मोठ्या आनंदाने मुलांस बक्षिसें वांटली. आदल्या दिवशी गा. वांतील श्रीमान्, विद्वान व सभ्य गृहस्थांस म्यानेजर साहबाकडून छापील निमंत्रणचिठ्या गेल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व मंडळी मोठ्या थाटाने विद्यालयांत जमू लागली. विद्यालयामध्ये सर्व तयारी उत्तम प्रतीची केली होती. सर्व शिपाई लोक पट्टे वगैरे घालून तयार होते. मुल नवे पोषाख घालून आपआपल्या स्थानांवर उत्सुकतेने वाट पहात बसली होती. म्यानेजर साहेब, हेड मास्तर, व इतर शिक्षक लोकही कुल्डूस' करून व्यवस्था ठेवण्यांत, स्वागत करण्यांत गंतले होते. सायंकाळा सहा वाजण्याच्या सुमारास नामदार रेसिडेंट साहेबांची स्वारी वजन दाखल झाली. प्रथमतः म्यानेजर साहेबांनी दाखविलेली शाळेची मारत, रसायनशाळा, लायब्ररी वगैरे पाहन साहेब बहादर फार खुष झाले. नंतर खारी येऊन स्वस्थानापन्न झाली. तेव्हां सवानी वाचा जयघोष केला. त्या आनंदाच्या भरांतच सभेच्या कामास सुरवात झाला. प्रथमतः म्यानेजर अप्पाराव ह्यांनी भाषणास सुरवात कला. त्यात त्यांनी गौड सारस्वत ब्राह्मणांचे मूलस्थान बंगाल्यांतील हापूरह होय. ह्यासच हल्ली 'तीरहट्ट' असें ह्मणतात. तेथून परशुरामाना त्यास वसाहत करण्यासाठी गोमांतकांत बोलावून आणले. पोतुगीज लोकांची राज्यक्रांति होईपर्यंत ते तेथेच होते. पुढे पोर्तुगीज लोकाच्या धर्मभ्रष्टपणास त्रासन समारें पांचशे वर्षांपूर्वी ते कोचीच्या महाराजाच्या आश्रयाखालीं कोचीस वसाहत करून राहिले व आपल्या निढळच्या घामाच्या पैशावर उदयास येऊन त्यांनी हे देवस्थान स्थापन केले. परंतु पाश्चात्य विद्येमध्ये ते आजपर्यंत मागसलेले आहेत. त्यांची उन्नति करावी ह्यासाठी ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे; इत्यादि पीठिका निवेदन केली. त्याच्या अभिनंदनार्थ सर्वांनी टा