या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८3-1 अंक ५ वा. मे १८९८.. १०७ ल्यांचा गजर केला. नंतर हेड मास्तर मि. रंगाप्पा शनै हे उठले; व त्यांनी शाळेचा रिपोर्ट वाचून दाखवून तिची प्रगति व इत्थंभूत स्थिति ह्यांचे वर्णन केलें, व पुढे तिचा रोंख कोणीकडे वळविला जाईल हेही सांगितले. त्यांचा रिपोर्ट वाचून झाल्यावर त्यांसही सर्वांनी आनंदाच्या टाळ्या दिल्या. नंतर साहेब बहादुरांनी खहस्ते मुलांस परमादराने बक्षिसें वांटली, व उत्तेजनपर असें सुरस भाषण केले. त्याचे समग्र भापांतर पुढे दिलेच आहे. अध्यक्षांचे भाषण पुरे झाल्यावर टाळ्यांचा मोठा गजर करून सर्वांनी मोठा जयजयकार प्रदर्शित केला. नंतर हार, तुरे, गजरे, पानसुपारी, अत्तरगुलाब, होऊन साहेबांची स्वारी ठळक ठळक सभ्य गृहस्थांसमवेत विद्यालयांतून बाहेर पडली. अशा रीतीने हा समारंभ उत्तम प्रकारे साजरा झाला. सरतेशेवटी श्रीव्यंकटेश्वराच्या कृपेकरून ह्या हायस्कुलाची उत्तरोत्तर भरभराट होवो, व त्याचें कॉलेज झालेले लोकांच्या दृष्टीस पडो, व त्यांतील विद्वद्रत्नांनी त्यांचा समाज भूषणभूत होवो, येवढी अपेक्षा बाळगून ह्या लेखाची परिसमाप्ति करतो. कोची येथील तिरुमल देवसमच्या हायस्कु लांतील बक्षीससमारंभाच्या वेळी त्रावणकोर व कोचीनचे रेसिडेंट नामदार रीससाहेब ह्यांनी केलेले भाषण. मुख्याध्यापक, आणि सभ्य गृहस्थहो, । प्रथमतः आज आपणांस मजकरितां येथे तिष्ठत बसावे लागले, ह्याबद्दल फार हळहळ वाटते; पण त्या कामी माझा अगदीच निरुपाय झाला. आपणांस माहितच आहे की, महाराणी सरकारच्या हुकुमाप्रमाणे आज दरबार भरून त्यांत येथील महाराजांस पदवीदान केले जाईल, अशी मला आशा होती; परंतु दुर्दैवाने महाराजांची प्रकृति अस्वस्थ झाल्यामुळे, राजेसाहेबांच्या भेटीकरितां मला राजवाड्यांत जाणे भाग पडले, आणि आपणांस मजसाठी खोळंबून बसण्याची