या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९८. लचे बील गेल्या वर्षी कौंसिलपुढे आले होते, त्याच्या पूर्वीच ते ह्या संबंधाने नेहेमी बोलत, आणि त्यासंबंधी बोलून बोलून आह्मीं पुष्कळच वाटाघाट केलेली आहे. त्यांत त्यांचे मतही माझ्याप्रमाणेच पडे. धार्मिक संस्थेच्या पैशाचा सद्यय होत नाही, फंडाच्या पैशाची अव्यवस्था होते, येवढेच नव्हे, तर तो कधी कधी भलत्याच कामाकडे खर्च करण्यांत येतो; ही ओरड साऱ्या हिंदुस्थानभर ऐकावयास येते. ह्मणून येथील फंडाचा पैसा समाजांतील लोकांच्या उन्नतीकडे आणि शिक्षणाकडे लागलेला पाहून अतिशय समाधान वाटते. म रिपोर्टावरून मला असे समजून येते की, ह्या शाळेत ह्या वर्षी २९१ हून कमी मुले नव्हती; आणि ही संस्था नीट रीतीने चालण्यासाठी, देवस्थानाच्या फंडांतून दरमहा ३०० रुपयांपेक्षा कमी नाही, इतका खर्च करण्यांत आला. इतकी सुधारणा किंवा प्रगति कोचीच्या राज्यांत झाली हे निर्विवाद आहे. ही संस्था मुलांना केवळ शिक्षण देते, येवढेच नव्हे, तर कित्येक वेळां जरूर पडल्यास त्यांना वाचावयास पुस्तकें देते; घालावयास कपडे देते; आणि खावयास अन्न सुद्धां देते. (टाळ्या) सांप्रतकालीं ह्यापेक्षा अधिक ततूंद ठेवणे, कोणत्याही संस्थेला कठीणच आहे. आपणांपैकी पुष्कळ लोक शाळेमध्ये होते; त्या शाळा आपणांकरितांच केलेल्या होत्या; पण दरोबस्त वस्तु पुरविण्याचा काही कधी त्यांनी मक्ता घेतलेला नव्हता. (हशा.) आणि मला वाटते, सर्वसाधारण पद्धत हीच आहे. मिस्तर अप्पाराव, हे आपला पुष्कळ वेळ खर्च करून, व आपल्या नेहेमींच्या धंद्याला खार लावून घेऊन, ह्या शाळेच्या उन्नतीकडे आणि क्रमाकडे लक्ष्य पुरवितात, असे दिसून येते. तेव्हां अशा सुप्रसंगी, त्यांच्या परिश्रमाचेही अभिनंदन करणे योग्य आहे. (टाळ्या.) । ह्या शाळेत बहुतकरून हायस्कुलासारखेच वर्ग शिकविले जातात. तेव्हां त्यांतील विद्यार्थी कांही दिवसांनी निःसंशय म्याटिक्युलेशनच्या परीक्षेस पाठविता येतील. मिस्तर अप्पाराव, आणि त्यांचे सहकारी, ह्यांचीही निःसंशय अशीच आशा अ. सेल, पण म्याटिक्युलेशनसाठी मुले आज तयार झाली नाहीत ह्मणून वाईटही वाटावयास नको. कारण, पुष्कळ शाळा अशा आहेत, आणि त्यांतून अनेक उमेदवार परीक्षेसही जातात. ह्मणून आपल्याला ज्या चांगल्या ह्मणून शाळा पाहिजे आहेत, त्या प्राथमिक शिक्षणाच्याच पाहिजे आहेत. बुद्धिमान् आणि चलाख मुलांना शिकविणे सोपे आहे. पण समाजांतील अज्ञानपणा समूळ का. ढून टाकून त्यांस एफ. ए., बी. ए. आणि म्याट्रिक्युलेशनसारख्या परीक्षेत पास