या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. करवून थोरपणास चढविणे, हे अत्यंत लोकोपयोगी, परोपकाराचे आणि दुर्घट असें काम आहे. देवस्थानाच्या फंडांतून चाललेल्या शाळांमधून संस्कृत अभ्यासाची हयगय न होणे ही गोष्ट स्वाभाविकच आहे. आणि ज्याला हिंदुस्थानांतील प्राचीन भाषांची आवड आहे, आणि जो आपल्याभोंवतीं संस्कृतज्ञ लोक पारखून ठेवतो, अशा राजाच्या कारकीर्दीत त्याच्या राज्यामध्ये त्याची भरभराट व्हावी हेही साहजिक आहे; आणि मला वाटते, आपणांपैकी पुष्कळांस हेही स्मरण असेल की, नामदार गव्हरनरसाहेब कोचीस आले होते, त्या वेळी श्रीमन्महाराजांच्या अन्योंकोलमच्या कॉलेजमध्ये त्यांनी जे भाषण केले त्यांत, प्राचीन शिक्षणाविषयीं दुर्लक्ष्य केले नव्हते, इतकेच नव्हे, तर संस्कृत अभ्यासाबद्दल फार संतोष प्रदर्शित केला होता. त्यांच्यापेक्षा अधिकाराने पुष्कळ कमी, परंतु तितक्याच निश्चयाने मीही समाधान मानतो. ह्या शाळेचा असलेला उत्तम पुस्तकसंग्रह व तीत शिकविलल ड्राइंग, हे पाहूनही मला फार संतोष झाला. ही विद्यालयाची सुंदर इमारत बाधण्यालाही, देवस्थानाच्या फंडांतूनच रक्कम खर्च झालेली आहे. ह्मणून हा संस्था सर्वच त-हेने लोकोपयोगीपणांत आणि यशस्वीपणांत आपला सा फडकावील हे उघड आहे. आतां शेकडा किती मुलें पास झाली वगैरे किरकोळ गोष्टींचा मी विचार करीत नाही. ही शाळा ईर्येची असल्यामुळे, तिच्यांतील कामही ईष्येनच लत. ह्या संस्थेचा मुख्य हेतु, शिक्षणाच्या योगेंकरून एका विशिष्ट जातीची त करण्याचा, आणि तिचा अनुत्साह घालविण्याचा आहे. ही जात झणजे गाड सारस्वत, किंवा मला जी कोंकणी ब्राह्मण ह्या नांवानें अधिक पारावा ता. हे जातीचें नांव सरस्वतीपासून प्राप्त झाले खरे, पण ते आजपर्यंत निरर्थकच झाले असे दिसते. कारण, तींतील लोकांनी उच्च प्रतीच्या शिक्षणासंबंधानें निरुत्साह दाखविला होता. किंवा ह्या बाबतींत ते मागे पडले होते. पण ते ज्या अर्थी ह्या पदवीचा उपभोग घेत आहेत, त्या अथा यापुढ विद्यादेवीची श्रेष्ठ मुले होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे; आणि ह्या संस्थेसारख्या सस्थाच्या मदतीने ते पुढे आपल्या नामाची सार्थकता करतील अशी आह्मी फार आशा करितों. ही जशी माझी दृढतर इच्छा आहे, तशीच ज्या श्रीमन्महाराजांना मी नुकताच भेट्रन ह्या चित्तवेधक समारंभास हजर झाला, त्या असल्याबद्दल माझी खात्री आहे.