या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १८९८. पुस्तकपरीक्षा. अहल्याचरितकाव्य-हें राव० हरि मोरेश्वर, प्रिन्सिपाल, ट्रेनिंग कॉलेज, अकोला, ह्यांनी करून तें परमादराने आमच्याकडे पाठविलें. ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांतील गुणदोषविवेचनास प्रारंभ करतो, 'ग्रंथकाररूपाने लोकांपुढे येण्याचा' प्रस्तुत कवीचा हा पहिलाच प्रसंग आहे. आणि 'संस्कृताचे काही मिश्रण असल्यावांचून काव्याच्या प्रौढपणास किंवा गांभीर्यास किंचित् न्यूनता' येते; व 'यावनी शब्द' मराठी भाषेचेच होऊन बसलेले 'शुद्ध मराठी काव्यांत येण्यास हरकत नाही' असें कवीचे मत आहे. शुद्धलेखनासंबंधाने पुरातन कवींनी जी मोकळीक घेतली आहे, तिचेच त्यांनी त्यना. धिक्येकरून अनुकरण केले आहे. ह्यावरून पुढील काव्याची बऱ्याच अंशाने वाचकांस कल्पना होण्यासारखी आहे; आणि हे जुन्या लोकांस तरी प्रिय होईल अशी त्यांस मोठी आशा आहे. आपले काम सांभाळून काहीतरी लोकसेवा करणे, आपल्या जन्मभाषेतील ग्रंथांत भर घालणे, कवितेसारख्या विषयास हात घालणे, श्रीमती अहल्याबाईसारख्या राजकार्यधुरंधर, साध्वी व पवित्र स्त्रियेच्या चरित्राची निवड करणे इतक्या गोष्टी प्रशंसेस पात्र होत, ह्यांत तिळमात्र शंका नाही; व त्याबद्दल प्रिसिपालसाहेबांचें आह्मी सर्व महाराष्ट्रीयांनी अभिनंदन करणेही योग्यच आहे, व त्याप्रमाणे आह्मी करतोही. शब्द'ही एक प्रकारची पुष्पं आहेत, व 'काव्य' हा त्या पुष्पांचा गुंफलेला हार होय. तो रमणीय होण्याला पुष्कळ गोष्टींकडे लक्ष्य पुरवावे लागते, पुष्पें नानाप्रकारची असतात. काही तांबडी असतात; कांही पांढरी असतात; व काही पिवळी असतात. त्यांची योजना फार शिस्तवारीने करावी लागते. अर्धा हार सबंध पांढऱ्या फुलांचा, व अर्धा हार सबध तांबड्या फुलांचा केला, तर विशोभित दिसतो. तीच फुलें कांहीं विवक्षित क्रमाने दोहों बाजूस सारखीं ओवली, तर त्यांची शोभा वृद्धिंगत होते. तसेच कितीएक फुलांचे देंठ व रचना ही मौजेची असते. उदाहरणार्थ, पारिजातक किंवा बकुळ, ह्या फुलांचे पदर पदर ओवून त्यांचा एकत्र हार केला, तर तो कंठीप्रमाणे शोभतो. कित्येक फुलांचा आकार लांबट असतो, त्यांची योजनाही यथोचित ठिकाणीच करावी लागते. गुलछबूची फुलें असली तर त्यांचा झुबका हाराच्या मध्यभागावरच आणणे योग्य. तुळशीच्या मंजिऱ्या, पाचेच्या मंजिऱ्या ह्यांची व्यवस्थाही