या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९८. होय. सरळपणा आणि सोपेपणा, हे कवितेचे मुख्य गुण होत. ते प्रस्तुत काव्यांत बहुतेक लुप्तच झाल्यासारखे आहेत. कित्येक मित्रांच्या सूचनेवरून कवींनी 'अर्थनिर्णायक टीपा दिल्या' हे तरी सुदैवच समजावयाचे. नाहीतर 'शाळेतील अल्प शिकलेली मुलें' व 'सामान्य वाचकचसे' काय, पण ह्या काव्याची अर्थमीमासा करणारे विशेष वाचक सुद्धा मिळण्याची पंचाईतच झाली असती. प्रारंभीचें नमनच पहा बुद्धीला कसें गुंगवून सोडतें तें: अजा धवल लोहिता-सितमयैक माहेश्वरी : सरूप विविधा प्रजा उपजवूनि सृष्टी करी ॥ तियेस अज एकतो भजभजे न सोडी परी नमोस्तु अपरा अजा तिस न भुक्तभोगे वरी ॥१॥ कवीच्या अर्थनिर्णायक टीपांच्या साह्यावांचून ह्या श्लोकांतील अर्थाच्या संशोधनाचे काम कोणता बहाद्दर करील तो करो! हे ह्मणे एका वेदांतील ऋचेचें भाषांतर आहे. ह्मणून त्यास सुलभ करावें, कां सवाई वेद बनवून सोडावें ? 'सरूप' 'भजभजे' 'भुक्तभोगे' इत्यादि पदें, व शेवटच्या चरणांतील वाक्यरचना फारच ध्यानात ठेवण्यासारखी आहे ! आतां उपमाचातुर्याचा मासलाः नका पुतुं किमर्थ हो त्यजुनि सार्वभौमा नपा स्तवाच अबला बळें कुठिल मांडलीकाधिपा। हल्या स्तविति की वदा जरि असे भला लठ्ठ तो परी सुरभि वानिती पिउनि दुग्ध आकंठ तों॥५॥ सार्वभौम नृपतीला 'भल्या लठ्ठ हेल्याची' उपमा ! कवीची कल्पना विशालच खरी ! आणखी शेवटच्या चरणांतील 'तो' चा संदर्प कोणीकडे लावावयाचा, १ प्रस्तुत काव्याची एका दृष्टीने मात्र फारच मोठी उपयुक्तता आहे. ती ही की 'काव्यप्रकाश' ग्रंथाप्रमाणे महाराष्ट्र काव्यातील दोषविवेचनात्मक ग्रंथ जर कोणी तयार केला, तर त्यास संस्कृतांतील काव्यप्रकाश- काराप्रमाणे निरनिराळया दोषांची उदाहरणे शोधून काढावयास निरनिराळे ग्रंथ पहावयाची तसदी नको. ते सारे दोष ह्या एका 'अहिल्याचरितकाव्यां'त सढळ प्रमाणाने आढळून येतील. ह्याबद्दल तरी राव० शेवड्यांचे काही थोडे उपकार नाहीत! वर सार्वभौमाला दिलेल्या 'हल्या' च्या उपमेला काव्यप्रकाशामध्ये 'अनुचितार्थत्वदोष' असें ह्मटले आहे. त्याचे लक्षण 'उपमायां उपमानस्य जातिप्रमाणगतन्यूनत्वं अधिकता वा तादृशी अनुचितार्थत्वं दोषः.' ह्याचे उदाहरण: