या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तो ईश्वरास माहित. ! पण कवीची टीप तर पहा:-"पर्यंत, किंवा या शब्दाचा अन्वय 'सुरभि' शब्दांशी करून याचा 'तर' असा अर्थ करावा.” ठीक आहे. मग 'परी'ची नेमणूक कोणीकडे ? आता अहल्याबाईंनी पतीबरोबर सहगमन करण्याची इच्छा दर्शविली, त्या वेळी सासऱ्याच्या विनवणीचा मासलाः पतीसह करावया गमन चित्त चिंती तिचे परी वच न मोडवे श्वशुर दीन मल्हारिचें। गळां पडुनि तो तिच्या रडुनि गायसा हंबरे बये करिसि उष्णता मज ग वार्धकी हैं बरें ॥ ५० ॥ सुनच्या गळां पडुनि' 'रडुनि' 'गायीसारखा हंबरडा फोडून' सासरे ह्मणतात "बय! ग! मज वार्धकी उष्णता करिसि बरें हँ !” केवढा हा करुणसाचा लाढा! वार्धक्यामध्ये उष्णता ती कशी काय करावयाची? पण उष्णता करणक्षण काय, ते ग्रंथकार सांगतात 'सुखदायक थंडी घेऊन जाणे.' 'करामाया शब्दानं सहगमनामध्ये 'खो' घातला हेही काही सामान्य उपकार नाहीत! सासू व सासरा आणखी करुणा भाकतात:-- आह्मी उभयतां असूं जरठ पांढरी ताकशी। आह्मी 'ताकासारखी पांढरी सफेत आहोत' बरें ! झणूनः या करिं आह्मांवरी सकळिकांस तूं आसरा । आणि जगांतील नियम सांगतात-- सुनेविण कुठे कधीं कवण शोभला सासरा ॥ ५२ ॥ किती अप्रतिम भाषणशैली ही! पुढें:-- तुझेवरि तुझ्यापरी मम शिरी हि दुःखाचल । बलिष्ठ विभुलालसा शरण तीस जाई चल । तुझ्यापरी तुझ्यावर आणि (माझ्यापरी) माझ्या मस्तकावरही दु:खाचा पर्वत (कोसळला आहे). ह्याकरितां विभ-देवाची-लालसा-इच्छा-बलिष्ठ झ० बलवान् चण्डालैरिव युष्माभिः साहसं परमं कृतम् । वन्हिस्फुलिंग इव भानुरयं चकास्ति ॥ "आपण तर काय वुवा मोठे चांडाळाप्रमाणे साहस केलेत !! आणि हा सूर्य तर काय अगदी एखाद्या कोलतीप्रमाणे चकाकतो आहे!"