या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १८९८. आहे तिला शरण होई. होई ह्मणजे जा. चल, हो पुढे ! बसलीस कां आतां ? केव्हाही सांगावयाचें तें सरळ शब्दांनी सांगावयाचे नाही. वांकड्यातिकड्या रस्त्याने व अपरिचित शब्दांनी सांगावयाचे, हा ह्या कवीचा नैसर्गिकच गुण आहे ! होळकर आणखी सांगतात:-- न मी असुख भोगण्या क्षणहि राहिं मागें तव । हाणजे दुःखाला शब्द घालावयाचा तर दुःख घालावयाचा नाही, असुख घालावयाचा ! पण पुढील दृष्टांत पहा: प्रसूनगति माळियाविण बरी न बागेत व ॥ ५३ ॥ कारण माळ्यावांचून बागेतील फुलांची स्थिति बरी रहात नाहीं ! आतां 'व' हणजे काय ? येवढाच प्रश्न राहिला. वाचक सहज ह्मणतील की ह्यांत काय अधिक आहे ? व झणजे 'आणि' हे ठाऊकच आहे. आतां असा शब्द कवितेत घालीत नाहीत ती गोष्ट स्वतंत्र आहे, पण नाही. अर्थ सुद्धां चुकला. त्याचा अर्थ कवि सांगतात. व झणजे 'अग.!! कवींनी आपल्या मनांतील अर्थाच्या टीपा दिल्या, हे फारच मोठे उपकार केले. कारण ते अर्थ दुसऱ्या कोणत्याही कोशांत सांपडावयाचे झणून नाहीतच. ह्या काव्यांत विशेष चमत्कार काय तो शब्दपांडित्याचाच आहे. ह्यास्तव त्याचा वेगळा कोश पुढे देऊंच. तूर्त उपमेची मजा पहाः रविश्वशुर मावळे अवचित प्रवासी, तशी तदंसिं पडली भली शकटधूर घाली तशी । निजासन तये क्षणी सुधृतिशक्तिला शोक दे पळे न मुकटा कसा त्वरित पाहिला की कदें ॥६९ ॥ ह्या पद्यांत कवीला श्वशुराला सूर्याची उपमा द्यावयाची होती. परंतु समासावरून अर्थ मात्र अगदी उलट झाला. ह्मणजे रवि हाच कोणी एक श्वशुर ! 'तदंसिं' ह्मणजे तिच्या खांद्यावर 'शकटधूर' ह्या गंगाजमनी समासाचे किती ह्मणून वर्णन करावें ? शकट झणजे गाडा, हा संस्कृत शब्द; आणि धूर हा आहे निवळ प्राकृत शब्द, ह्या दोहोंचा समास करता कामा नये. बरें घटकाभर मानले की, गाड्याची धूर तिच्या खांद्यावर भली मोठी पडली; तरी ' राज्यशकट' अशा त-हेचा काही उल्लेख नको काय ? 'घाली तशी' ह्या पदाचा अर्थ कवि सांगतात-"जबरदस्तीने घातल्यासारखी." हा अर्थ कोणास कळेल ? आणि कोणत्या कोशांत सांपडेल ? तिसऱ्या चरणांतील स्वारस्याचा माग काढ