या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. ण्याची मुष्कील पडल्यामुळे, कविनिर्मित टीपेच्या आधारानेच अर्थ लागतो. तो असा. “आपली जागा त्या क्षणीच धैर्याने आलेल्या मोठ्या शक्तीला शोक देती झाली." ती कशी ? "कदाने पाहिल्यावर मुकटा लगबगीने कसा बरें पळणार नाही ?" वः ! काय पण दृष्टांत. मारूच खरा! एके दिवशी आमच्या घरी सहज एक कद आला, तो सारे मुगटे पळत सुटले, आणि एक जीर्ण होता तो तर भव्य अडखळूनच पडला! तो त्याने त्यास आपला उचलून तोंडांत टाकलें, आण चट्टामट्टा करून सोडला ! ! खरोखर कदाइतके हिंसक, आणि मुकट्याइतके भित्रे प्राणी जगांत कोणीही नसतील! ! असो. पुढेः सती श्वशुर जीवतां बहुत कारभारा बघी ह्मणूनि नच घाबरे; विपुल संग्रहीं राब-घी। अहो ! हृदय हे धरा दुहितृमातृभार्यादिकां सुशिक्षणगदेस द्या; समयि भीतिला घेति कां? ॥ ७० ॥ खात 'बधा' हैं क्रियापदाचे रूप मुळी चुकीचे आहे. 'बघे' असें पाहिजे. १० द्राविडी प्राणायाम कशाकरितां? तर राब-घी' शब्दांचा यमक पापण्याकारता ! 'राब' आणि 'घी' काय पण शब्द ! गुलदस्तांतलेच खरे! कठार, मृदु, परिचित, अपरिचित. स्वभाषा, परभाषा ह्यांचा काही विचार ? सस्कृत शब्दांशिवाय जसें गांभीर्य येत नाही, तसें यावनी शब्दांवाचून झणझणीतपणाही येत नाही, असें कवीचे मत दिसतें. बरे; "सासरा जिवत असताना कळ कारभार पहात असे, ह्मणून घाबरत नव्हती. आणि तिच्या संग्रहास हवी तितकी काकवी आणि तप होतें !" ह्या वर्णनात खुबी ती काय? पण कवि ह्मणतात: राब-धा' हे शब्द 'संपत्तीचे उपलक्षणभूत होत! उपलक्षणभूत नव्हे, प्रत्यक्ष भूत होत! ह्मणून कवि ह्मणतात-" अहो! मनांत हे धरा की, आपली मुलगी, आई, पत्नी वगैरेंच्या हातांत सुशिक्षणगदा द्या ह्मणजे मग प्रसंग पडला असतां त्या भितील काय ?" खरोखरच भिणार नाहीत. आह्मी ह्मणतों चिरंजी १ ह्या दोषाला 'काव्यप्रकाशा-' मध्ये 'प्रसिद्धि विरुद्धता' असें नांव दिले आहे. त्याचे लक्षण:-" तथाहि अनुप्रासस्य प्रसिद्धयभावो वैफल्यं वृत्तिविरोध इति ये त्रयो दोषाः, ते प्रसिद्धि विरुद्धतां अपुष्टार्थतां प्रतिकूलवर्णतां च यथाक्रमं न व्यतिक्रामन्ति तत्वभावत्वात् क्रमेणोदाहरणम:......"