या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १८९८. ११७ तक वांनी मातोश्रीला गदादान करण्यापूर्वी नातवांनी आजीबाईवर आधी प्रयोग करावा तो बरा ! अशा अशा कल्पना, असा असा उपदेश, असे असे दृष्टांत ज्या मस्तकांतून बाहेर पडले, तें मस्तक खरोखरच जाडे असले पाहिजे. अहल्याबाईवरून स्त्रीशिक्षणाचा नियम काढून मातोश्रींना गदा देण्यास सांगणे, हे तर्कशास्त्र खरोखरच लोकोत्तर आहे, ह्यांत शंका नाही. खालच्या श्लोकार्धात फारच मौज आहे: सुताधिकृति मानुनी वसन सार्वभौमें दिले तये चिर न भोगिले सुकृतभोग्य भौमेदिले ॥ एक चमत्कार सांगावयास निघावें, तो दुसरेच वाटेवर अडिवतात. असा ह्या काव्यांतला गुण आहे. राज्याधिकाराची वस्त्रे, आणि ती बहुतकरून साडेतीन मिळण्याचा परिपाठ असून प्रिन्सिपालसाहेबांनी एकच वस्त्रावर बिचायाची बोळवण केली आहे ! इतकें रिडक्शन, व इतराजी कां ? तर दुसऱ्या वस्त्राला मात्रागण आपल्या जातींत घेईनात ह्मणून! 'तये' ही विभक्ति कोण ? हे असो. पण 'भौमें दिले' हा प्रॉब्लेम आमच्या वाचकांतील बुद्धिबळवंतांनी जर सोडविला, तर त्यांची शामत खरी. पण तो प्रत्यक्ष कवीच्या हृदयांत शिरल्यावांचून सुटणार कसा ? कवीचे प्रस्तुत शब्दावरील भाष्य पहा कसें मौजेचें आहे तें:-' या शब्दांत 'र' व 'ल' हे सवर्ण असल्यामुळे 'रे'बद्दल 'ले' घातला आहे, 'भौदिरा' ह्मणजे राज्यलक्ष्मी ! प्रस्तुत कवींना ग्रंथकाररूपाने लोकांपुढे 'येण्याचा दुसरा प्रसंग आल्यास त्यांनी आधी स्वकपोलकल्पित एक कोश, भाष्य, व्याकरण इत्यादि स्वार पुढे पाठवून मागाहून खासास्वारी बाहेर पडेल तर बरें! नाहीतर टीपारूपी भालदार, चोपदार, प्रत्येक ठिकाणी खांच, खळगा दाखवितांना किती ह्मणून कंठशोष करतील! ज्या काव्यांत मौजेशिवाय एक चरणही शपतेला सांपडत नाही, त्याचे उतारे तरी किती ह्मणून द्यावेत ? ह्याकरितां उपमेचेच एक दोन मासले झणून काही चरणांवरच भागिवतों: इजा मग विजा तिजा जनि अशी असे वाग निकी । 'करा हरण राज्य है' मसलती करी राघुशीं । सुगुप्त परि वृत्त ते प्रकटिले कसे ही घुशीं । न कैक धनदापरी ऋण माणून मागे धना ।