या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९८. ११९ सांगेपर्यंत 'किंवा' शब्द घालावयाला मानेवर कोणी दगड का ठेवला होता ? _एकंदरीत ह्या काव्यांत कवीचे मनसोक्त वर्तन फारच ध्यानात ठेवण्यासारखें आहे; आणि तें शब्दरचनेत फारच उत्कृष्ट रीतीनें स्पष्ट होते. ते वाचकांस कळण्यासाठी आझांस बराच लांब कोश द्यावा लागणार व तो वाचकांस वाचावा लागणार. तरी त्यांत विशेष करमणूक असल्यामुळे वाचक अव्हेर करणार नाहीत अशी आशा आहे. प्रथमतः ‘जुन्या कवींच्या धर्तीवर' मूळरूपाप्रमाणे शब्द किती शुद्ध आहेत त्यांची मालिकाः_ कसुटीस, अजी मित्तिला, वीहिरी, मीरवी, पीशव्या, तीळ, अकल, अमलदार, दस्रा, गौगावा, दीसे, भृकूटी, धरीति, मूकति, इ० इ० इ०. आता काहीं विचित्र रूपांतराचे चमत्कार:१ पौष्पी मधीं-फुलांतील मधामध्ये, | ११ घोट घोडे. २ मिथ्य-मिथ्या. १२ कृतिता=कुशलता. ३ उभ-उभयतां. १३ व्यर्थक व्यर्थ. ४ वासरी कालवड. १४ गौगवा-गवगवा. ५ ताविज=ताईत. १५ सुत्रधारी सूत्रधार. ६ सला=सल्ला. १६ कति किती. ७ बारमा बारमाहे. १७ मुगल मोंगल. ८ सहूनि=साहून. १८ टकर-टक्कर, ९ बुढा-बुढा. १९ युधर्थ युद्धासाठी. १० वका= आपल्या. २० लढवय्य लढवय्या. आतां तिसऱ्या जातीचे शब्द ह्मणजे ज्यांचा अर्थ कवीच्या हृदयभांडाराखेरीज दुसऱ्या कोठेही आढळावयाचा नाही असे: लुटति लोळतात. लुट हा मूळ संस्कृत शब्द; त्याला 'ति' हा मराठी प्रत्यय लावला! झणजे सरकारी पांचव्या पुस्तकातील 'वीर गच्छले सैन्य घेउनी !' ह्यांतील 'गच्छले' शब्दाला जोडी मिळाली ! तोच मासला 'शगद्रि शोकाचा पर्वत. ह्यापेक्षां शुचद्रि' हटले असते तर काही तरी शोभते. तनू-थोडा, याबूखरा-घोडा किंवा गाढव. 'बुधतांस' ह्या शब्दाची फोड कवि सांगतात. "बुधता झणजे विद्या.. या शब्दास सामान्यनाम समजून अनेक प्रकारच्या विद्या या अर्थी बहुवचन केले आहे. " वः ! इतका सरळ अर्थ असल्यावर