या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८. २२९ दावावया सुखद सुस्थल मार्ग चार हा सिद्ध सेवक सदा, सदसद्विचार ॥ १० ॥ किति तरि बघ खालीं, बाहुली साउलीला । बसुनि हंसुनि, त्यांची चालली काय लीला । सरलतर गुणांची, देखणी ती सुशील बघुनि बहु मजेची, तूं सुखें डोलशील ॥ ११ ॥ मधे बाई आई सम दिसतसे, भव्य बसली छटा आनंदाची, वदनि खुलते, रम्य कसली । जिचें, वाटे चंद्रासम, चमकतें तेज वरलें। अहाहा! प्रेमाचे बहुलतर बिंदू डवरले ॥ १२ ॥ हिला शांती कांती, सुखद बघुनी सर्व ह्मणती गुणांची, तोंडानें, करितिल, हिच्या, कोण गणती। खभावे ही साधी सदय सरळी शांत, दुसरी ___न पावे कोणीही, असुनि कितिही सुंदर, सरी ॥ १३ ॥ तिला बाळा साजे लखलख गळां में वळख तें सुवर्णाची कंठी, सुरुचिर सरी ती झळकते। क्षमा ऐसें देती, सकल जगतीं, नांव तिजशी जपे शांती तीतें, जपति मनुजे, जीवित जशीं ॥ १४ ॥ शांतीच्या जवळी सुरेख चिमणी, ती जी मुले गोजिरी हर्षे खेळति खेळ सुंदर भले, लीलेंत नानापरी ज्यांचे गोंडस हात पाय मृदु जे, पद्मापरी कांतिला चित्तस्वास्थ्य, परोपकार, करुणा, ही तीन बाळे तिला ॥१५॥ पाहे ती करुणा, सुरम्यवदना, शोभे कशी भूषणे आईची प्रतिमा सुरेख दुसरी, कांहीं न कोठे उणें । पाठी राहुनियां उभी निरखित, की कोण दुःखी दुरी ढाळी अश्रु करोनि कींव बहुधा, तदुःख यत्ने हरी ॥ १६ ॥