या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तंबाकूचा धूर, एसेन्स ऑफ टरपेंटाइन, गंधकाची धुरी इत्यादिक औषधांची योजना चांगल्या प्रकारें लागू पडते. पायाचे मलम, रसकापूर ह्यांनीही ह्या प्राण्यांचा फडशा उडतो. तांबड्या मिरच्या कुवळून ते पाणी खुातून वगैरे ओतलें असतांही हे प्राणी मरतात. ___ढेकणांमध्ये मनुष्यांना चावणाऱ्या जाती दोन आहेत. एक जात आहे ती घरांतील फटींतून राहते. पण दुसरी आहे ती नेहेमी सखल भागावरून फिरत असते. ते जमून राहत नाहीत, एकएकटेच सारी दिवसरात्र फिरत असतात. ह्यांची चोंच किंवा नांगी लांब असते. त्याच्या देशापासून अतिशय वेदना होतात. आणि फार मोठी गांद यत. फ्रान्समध्ये एक प्रकारचे उडते ढेकूण आहेत. ते बहुतकरून खुला व धुराडी ह्यांच्या नजीक असतात. ह्या ढेकणाची लांबी पाऊण २१ असत. शरीर दीर्घवर्तळ. वरून सपाट व पंख सुरेख उडण्यास जागा पडण्यासारखे असतात. मस्तक चिंचोळे असन त्यावर दोन व वाटोळ काळे कळकळीत डोळे असतात. ह्याला रात्री फारच उरख दिसत. हे साधारण प्रयत्नानें कधीं सांपडत नाहीत. हे उन्हाळ्यामध्ये रात्रौ दिव्याभोंवतीं जमतात. ह्यांस धरणें तर फार जपून पाहिज; नाहीतर ते. चावतात. आणि त्यांच्या दंशापासून तशय वेदना होतात. इतक्या की, त्यांजपुढे मधमाशीच्याही वेदना ला नव्हत. आणखी, त्यांच्या दंशापासून तत्काल सूज येते. मग या काळ्याच्या जाळ्यामध्ये सांपडतात. परंतु कोळी त्यांस शिवत सुद्धा नाहीत. त्याच्या नांगीला तो फार भितो. कारण, ह्या ढेकणाच्या नांगीमध्ये विष असते. पण ते कोणत्या ठिकाणी असते, ते ठिकाण प्राणिशास्त्रवेत्त्यांसही अद्याप मुकरर झालेले नाही. पंख फुटण्यापूर्वी हा ढेकूण अतिशय करूप व घाणेरा दिसतो. असे प्राणी निर्माण करण्यांत परमेश्वराचा हेतु कोणता, हे जाणणे हे मानवी शक्तीच्या पलीकडे आहे.