या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. जीवितौघ. श्लोक. हे आयुःसरिता भयप्रद महा, वाहे प्रवाहें कशी आमी जात असों, वहात मधुनी झाडें पुराने जशी । आधीं पाट, पुढे अफाट सरिता, लागे पुढे सागर ज्याचा अल्प न पार कल्पकवरां, गंभीर भव्योदर ॥ १ ॥ नौका हा नरदेह सुंदर गमे, आमी उतारू वरी साहित्य, विधिनिर्मितें निजसवें, घेवोनि नानापरी । चाले धांवत नाव ही सरसरां, आयुःप्रवाहांत या शोभे पात्र लहान की तरुलता, नौकाहि तैशी तया ॥२॥ पाणी निर्मळ वाहुनी झुळझुळां, मंजुध्वनी होतसे हर्षे चित्त रमे निरंतर गमे, येथे रहावें असें । पंक्ती, चित्रविचित्र रम्य हिरव्या, बालतृणाच्या किती झाल्या शोभित काय दोनहि थडी, आंखोनियां भोंवतीं ॥ ३ ॥ उदक शुद्ध शरद्गगनासम खळखळे खडकांवरि उत्तम । उडत खेळत खेळत चालला सरळ रम्य तदौघ दिसे भला ॥ ४ ॥ वस्तू अपूर्व मृदु मंद लहान सर्व तीरी बघोनि घन वर्षत हर्षपर्व । सौंदर्यतेज चमके नव ते विचित्र बालस्थिती वरुनि दावित दिव्यचित्र ॥६॥ धरुनि वृक्षलता नव मोहर अहह या दिसतात मनोहर । धरिति शीतल छत्र शिरावरी . गमत सौख्य धनाढ्य नृपापरी ॥६॥