या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. अहह रम्य दलें नव मंजिऱ्या दिसति सान तरूवरि गोजिया। मधुरसें गळती सकलांवरी त्यजुनि मत्सर ते लुटती झरी ॥ ७ ॥ लघु लघू तरुच्या फुलली शिरी किति सुगंधितशी सुमनें बरीं । खुलति रंग विचित्र परोपरी । घडिघडी गमतें धरूं तीं करीं ॥ ८॥ हातानी शीघ्र तोडूं, सुरुचिर सुमनें, कष्ट थोडे सहातां आता चाखू रसातें, मधुर मधुरशा, पावले दोन जातां । आशापाशा वहातां, पळपळ निघुनी, काल जातो पहातां थाबना लेश नौका, परि घडिभरिही, त्या प्रवाहीं वहातां ॥९॥ कैसा तो रमणीय काल भुवनी, बालस्थितीचा अहा सारे सृष्टपदार्थ पाहुनि रमे चित्त प्रमोदें महा। राहे रिक्तकर स्वयें जिरुनि तें, औत्सुक्य ती आवडी हा! हा! हा! खल जीवितौघ नच दे, राहोनि एक्या थडी॥१०॥ जातां नित्य पुढे पुढेच सगळी, ती रम्यता अंतरे ता तारुण्यनदी, विशाल दिसते, पूर्णोदकाने स्फुरे । होते विस्तृत रुंद रुंद पुढती, तत्पात्र वेगें महा येतां यौवनकाल तूर्ण सकलां, पूर्णत्व ये नेम हा ॥ ११ ॥ भोंताली दिसती वनें उपवनें, विस्तीर्ण रम्याकृती क्षेत्रे सुंदर दाट येउनि पिकें, गोंडे तुरे दाविती । शोभे की, तरुवृंद रुंद फुटनी, खाशी नवी पालवी येवोनी, परिपक्क घोंस लवले, लाली फळांना नवी ॥ १२॥ 'आतां उंच तरू पहा चहंकडे, वाटे नभा भेदिती छायामंडप भव्य घालुनि अहा, संतोष देती किती ।