या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १२७ आलिंगोनि पति स्वरज्जुवलयें, घेतात ज्या चुंबनें वल्लींचे घनदाट कुंज बघुनी, तल्लीन होती मनें ॥ १३ ॥ विकसली कमले विमलें किती जिला भ्रमर लोलुप तद्रस सेविती । धवल हंस, विराजति गोजिरे अहह सुंदर काय सरोवरें ॥ १४ ॥ तया स्थानी खाणी, सुजनगुणसंपन्न भरल्या कदा यत्ने रत्ने, धनकनक नेतां न सरल्या । महत्तेजाने त्या, प्रखरतर तीरीं विलसती प्रभा ती पाहोनी, तपनकिरणें, न्यून दिसती ॥ १५ ॥ नभञ्चुंबी ज्याच्या, दिसत शिखरें सुप्रभ वन विसांवा घ्याया तें, सकल फलद, ज्ञानभवन । वसे विद्या तेथें, कनकखचिता दिव्य रमणी करी तत्सेवा जो, परमपद घेतो नरमणी ॥ १६ ॥ तिच्या दासी तीरीं अमित फिरती दासजन की अहा सर्वां ठायीं, करिति ममता, जी न जनकीं। तयांच्या हातांनी, अगणित लतावृक्ष रुजले फळांनी पुष्पांनी, सकल भरले, शिपुनि जलें ॥ १७ ॥ सदा ऋद्धी सिद्धी, बहु सदय, तीरावर सती उतारूची सेवा, झटुनि करण्या सिद्ध असती। सुधाधारें खर्णी कलश भरिती कोमल करी लुटी ब्रह्मानंदा, मधुर रस जो प्राशन करी ॥ १८ ॥ ह्मणे जाऊं घेऊ, अनुपम थडी, लाभ सकल परी होतो नौकागति खुटुनियां, जीव विकल । महा विघ्ने मार्गी, अगणित पहा आड पडुनी उतारूचे जाते, बल झगडतां, सर्व झडुनी ॥ १९ ॥