या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. आतां ये, घनघोर गर्जत महा, संसार हा भोंवरा माया मोह, अपार थोर वळसे, की खोल झाला दरा। पाहोनी थरकांप, होय गरका, त्याचा महा भ्यासुर जाते नाव बुडी गमे हरघडी, राहे न चित्त स्थिर ॥ २० ॥ हा! हा! वेगें, जवन सुटते, हे अहंभाव-वारें मध्ये, कांताकनक, उडती, जे विषाचे फवारे । आशा आणि प्रबळ हिमती, मेघतुल्य प्रचंड लाटा मोठ्या, वरि उसळुनी, होतसे खंड खंड ॥ २१ ॥ मध्ये थोर मनोविकार, सुटते मोठेच की वादळ वाढोनी, घनदाट कुंदपटले, हे माजवी कंदळ। होती धुंद भयाणशा दशदिशा, तो तीर जातो बरें सारासार विचार नीट धरिजे, हे तों सुकाणूं त्वरें ॥ २२ ॥ देखों येति पुढे कुशाग्रखडपें, ती दुःखशोकादिकें लोढे कैक उफाळती झरझरां, तेथें न कोणी टिके । त्याचे अग्र समग्र भंग करिती, नौका गमे तत्क्षणी सारासार विचार नीट धरिजे हे तों सुकाणूं झणीं ॥ २३ ॥ रगे जी व्यसनादि मोहक फुलें, ती पाडिती की भ्रम आहे घात परंतु त्यांत समजे, त्याला न होती श्रम । जाळ्या दाट अचाट खोल भरल्या, त्यांच्या जलाभीतरी गुता तो पडतां निघे न कधिही, प्राणांत झाला तरी ॥ २४ ॥ ज्वलित उग्र कली वडवानळ सकळ भस्म घडींत करी खळ । लघुलघू मद मत्सर ही भुतें । भयद नाचति घेउनि कोलितें ॥ २५ ॥ तया ठाया प्राणी, बह भयद, एकेक विचरे अति क्रूर खैर, प्रबळ फिरताती जलचरें।