या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १२९ महोग्रदृष्टीने, भुजग जलभागी विहरती अहा कोणाचेही, सहज डसुनी प्राण हरती ॥ २६ ॥ कामक्रोधभुजंग दारुण महा, फूत्कार तो टाकिती, एकाकी कवळोनि नाव करिती, मार्गात तोटा किती।। भाजोनी गरळानळे प्रथम तों, अर्धाग ती काढिली होतां हीनबला अपाप पुढती, नोहे गती कां ढिली ॥ २७ ॥ आनंदें टपतात तो जलचरें, भक्षावया यावरी आतां नाव धरीन एक ह्मणती मी मीच आधीं खरी । तो विक्राळ मुखें जळीं पसरती, सारी करोनी जुटी आधिव्याधि समस्त मीन-मगरी, घालूं पहाती मिठी ॥ २८ ॥ आला पूर खळाळ फार उदका, धादंत वाहे नदी लागे दूर दिसावयास उसळ, काळ प्रचंडोदधी । होतो संगम तो क्षणैक सगळी, जाती अरिष्टें जरा सर्वत्र दृढ शांतता पसरते, वारा सुटोनी बरा ॥ २९ ॥ येते शुभ्र छटा, प्रकाश चमके, नौकेवरी यापुढे वाटे झुंजुक अल्प अल्प पुढती, अत्युच्च ये सांकडें । भासे स्पष्टचि ये पुढे हळुहळू, आहे गिरी की उभा ज्याची दुर्घट उंच उंच शिखरें, भेदोनि जाती नभा ॥ ३० ॥ मृत्यू, जीवित लोहचुंबकगिरी, तो ये पुढे आडवा त्याचा ओघहि रोगरूप जबरा, एकेक येतो नवा । लागोनी अनिवार ओढ उदका, होतें सुकाणूं ढिले तेव्हां निश्चित पर्व सर्व कळते, जे शेवटी राहिलें ॥ ३१ ॥ तीराची, तरुची स्मृतीहि न उरे, जातात केव्हां कसे खाली तेंचि वरीहि तेंचि पुढती, सारा गिरी तो दिसे । आतां एक पळांत नाव थडके, होणार की शेवट तेव्हां दुर्धर टाळणे व्यसन तें, ब्रह्मासही दुर्घट ॥ ३२ ॥ SUण २