या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. पत्र्याला पडती घड्या बहुत की, तद्वर्णही ओसरे होती सदृढ खांबही खिळखिळे, वांकोनि जाती पुरे। भोंकेही पडती पहा हळुहळू, नाहीं गिरीला दया सारी जर्जर नावही करुनियां, सर्वस्व नेतो लया ॥ ३३ ॥ फळ्या आलिंगाया, गिरिस भिडुनी बंध तुटती खिळे सारे त्याला, झरर निसटोनी चिकटती । किती येती लाटा, प्रलयसमयींच्या उलटुनी । तडाख्याने वाटे, खचित बुडते नाव फुटुनी ॥ ३४ ॥ पुढे हाय कोणां कळे काय होतें खरा जाणता सर्वसाक्षी अहो तें। असे गर्द अंधार की सुप्रकाश नसे शुद्धिही होतसे बुद्धिनाश ॥ ३५ ॥ विरचितो कृति पोतक आवडीं करिल रंजन अल्प घडी घडी । रसिक वाचक पद्य तुकावुनी सरस नीरस घेउत मानुनी ॥ ३६ ॥ लोकोत्तर चमत्कार. लुटारूंचा प्रसाद! खरोखर 'लुटारू' व 'दरवडेखोर' ह्यांची गणना दुष्ट, नीच व हलकट लोकांत आहे. तथापि अशांतील पुढाऱ्यानेही कधी कधी दयाद्रेतेची, औदार्याची कृत्ये केलेली आढळून येतात. पण ह्यांत मोठेसे नवल नाही. कारण, दरवडा ही जरी भयंकर, अनीतीची व क्रूरपणाची कृति आहे, तरी नतन राज्यसुमनाच्या कलिकेचें तें एक स्वरूप आहे हे विसरता कामा नये. ह्मणूनच त्या ठिकाणी औदायर्याचा परिमळ उत्पन्न होतो. आलीकडील दरवडेखोरांत, तंट्या भिल्लाचें नांव तर अगदी जगजाहिर आहे. कारण, त्या बहाद्दराने मी मी ह्मणवि