या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १३१ णाऱ्या इंग्रज सरकारासही दहा अकरा वर्षे झुलवून सोडले होते! त्यानेही एक दोन औदार्याची मोठी चमत्कारिक कृत्ये केल्याचे त्याच्या चरित्रावरून दिसून येते. एक वेळ तंट्या भिल्ल आपल्या साथीदारांसहवर्तमान हत्यारबंद होऊन एका डोंगराच्या पायथ्याने चालला होता. त्यास मार्गावर एक गरीव भिक्षुक ब्राह्मण आढळला. तो अतिशय खिन्न आणि प्रवासाच्या श्रमामुळे थकलेला दिसत होता. त्यास तंट्यानें “तुह्मी कोण ? कोठे जातां? " वगैरे प्रश्न विचारून चौकशी केली. तेव्हां तो ह्मणाला " मी एक गरीब ब्राह्मण आहे. घरांत दारिद्य फार. एक मुलगा मुंजीस आला आहे. त्याकरितां देशावर फिरतों, परंतु कांहीं प्राप्ति होत नाही. त्या काळजीत आहे.” तेव्हां तंट्या भिल्ल ह्मणाला " भटजीबुवा, तुझी कांहीं काळजी करू नका. तुमचें घर कोठे आहे ते मला सांगून ठेवा, आणि घरी खस्थ बसा जा. मी तुमच्या मुलाच्या मुंजीची तजवीज करतो.” त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने आपले नांव, गांव सांगितले, आणि तो घरी जाऊन बसला. बिचारा तंट्याला पाहून घाबसून गेला होता. कारण, तंट्याच्या व त्याच्या बरोबरच्या जामानिम्यावरून ते दरवडेखोर असावेत अशी त्याची खात्री झालीच होती. व तंट्याचें नांव त्या वेळी त्या प्रांती तर महशूरच होते. तेव्हां त्या काळवरूप्यांकडून प्राप्ति व्हावयाची तर लांबच, पण प्राणानिशी सुटतों किंवा नाही, ह्याचाच त्या ब्राह्मणाला संशय वाटत होता. तरी आपण निष्कांचन असल्यामुळे बचलों येवढीच मिळविली असें त्यास वाटले. परंतु चमत्कार हा की, हे भटजीबुवा आपल्या घरांत दुसऱ्या दिवशी जों हरि हरि ह्मणत बसले आहेत, तो दोन चार मनुष्य बैलांवर गोण्या घातलेले भटजीबुवांचें घर शोधीत आले. आणि भटजींस ह्मणाले " भटजी! आपणांस तंट्या भिल्लाने ह्या. गव्हांच्या गोण्या पाठवून दिल्या आहेत, ह्या घ्या." हे ऐकून भटजीबुवा फार विस्मित झाले. आणि त्यांनी ते गहूं ठेवून घेऊन त्यांची रास केली. पहातात तों बावीस खंडी भरले! बिचाऱ्याच्या मुलाची मुंज होऊन एक दोन वर्षांचा प्रपंच सुद्धां भागला असेल!