या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. , तंट्याविषयीं दुसरीही अशीच एक औदार्याची गोष्ट मोठी चमत्का. रिक आहे. एके दिवशी रात्री खानदेशांतील एका गांवांत तंट्या भिल्लाचा दरोडा गेला. तंट्याची किंवा प्रसिद्ध दरोडेखोर जे प्रसिद्ध होऊन जातात त्यांचीही अशीच चाल असते की, ज्या गांवांत दरोडा घालावयाचा असेल, तेथील श्रीमान् गृहस्थाकडे किंवा पाटील कुळकरण्याकडे आधी एक चिठ्ठी पाठवून तींत कांही मोठ्या रकमेची मागणी करावयाची; आणि हे रुपये न आल्यास आह्मी रात्री हत्यारबंद येऊन लूट करू असा धाक घालावयाचा व त्याप्रमाणे करावयाचे. तंट्याने त्या गावाला पूर्वी अशीच चिठ्ठी पाठविली होती; व त्याप्रमाणे गांवकन्याना ऐवज कांहीं पाठविला नव्हताः व गांवांत विशेष दहशतहाँ नव्हता. कारण, असा सांगून सवरून कोणी दरवडा घालावयास येतो का काय, अशी त्या गांवकऱ्यांची समजूत झालेली होती. ती चिट्ठी मणज काणी तरी वात्रट मनुष्याने केलेली टवाळी होय, असे समजून सारा गाव स्वस्थ होता. इतक्यांत तंट्याच्या दरवड्याचा दिवस येऊन पला. त्या दिवशी सदरह गांवांतील एका गृहस्थाच्या घरी लग्न समारंभ असन रात्रौ नवरानवरी पालखीत बसवून वाजत गाज ताचा मिरवणूक चालली होती. इतक्यांत तंट्या व तंट्याचे लोक हत्यारबंद झालेले गांवांत येऊन दाखल झाले. मग काय विचारावे. काठची वरात आणि कोठचे काय! सर्वांच्या तोंडचे पाणी पळाल. जा ता आपला प्राण घेऊन धांवत सुटला! कोठचे वाजंत्री आणि कोठचे मशालजा ! सान्यांची मनांतल्या मनांत तिरपिट उडून गेली. नवन्यामु लाच्या अगावर तर दागिने होते. ह्यास्तव भोयांनी पालखी रस्त्याच्या एका बाजूस ठेवून तिच्यावर एक पडदा झांकण घातला, आणि तेही पळा वयाच्या बेतांत होते. इतक्यांत तंट्या भिल्ल खतःच तेथे गेला, आणि त्याने त्यांस विचारले की काय आहे? कोठे चाललां तुह्मी? तेव्हा त्या भोयाची तर बोबडीच वळली. ते कांपत कांपत हात जोडून ह्मणाल हा एका गृहस्थाची वरात जात आहे.” तंट्याने विचार "नवरानवरी कोठे आहेत?" तेव्हां भोयांनी नाइलाजास्तव पालखीवरचा बुरखा काढून नवरानवरींस दाखविले. तेव्हां तंट्याने जवळ मशाल आणवून त्या नवरीच्या मुखाकडे पाहिले, आणि मोठ्या