या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १३३ संतोषाने तो ह्मणाला "वः! नवरी मुलगी फार चांगली आहे. कोण आहे रे तिकडे ? कालच्या दरवड्यांतले सारे दागिने घेऊन या." असें ह्मणतांच त्यांच्यापैकी एका मनुष्याने सुमारे २००० चे दागिने आणून पुढे ठेविले. ते पाहून तंट्या भिल्लाने ते सर्व दागिने स्वतः त्या मुलीच्या अंगावर घातले आणि वाजंत्री, भोयी, ह्या सर्वीस हाक मारवून आश्वासन दिले की, तुह्मी कांहीं भीति बाळगू नका. तुमची वरात खुशाल जाऊं द्या. हा तंट्या भिल्ल आहे. हा गरीबगुरिबांचा कधीही छळ करावयाचा नाही हे ध्यानांत असू द्या. असें ह्मणून ती वरात पूर्ववत् त्याने रवाना केली, तेव्हां त्यांस संतोष झाला. नवरी मुलीचा बाप जातांना तंट्यास मुजरा करावयास आला, त्यास तो ह्मणाला 'ती मुलगी माझीच आहे असें मी समजतो. तिच्या अंगावर घातलेले अलंकार मी खुषीने तिला दिले आहेत.' हे ऐकून तिच्या बापास काय वाटले असेल, हे सांगणे नकोच. ही आमच्या देशांतील लुटारूंची गोष्ट झाली. पण युरोपांतील लटारूंमध्येही अशाच प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी घडल्याचे दाखले आहेत. मेकॉले आणि इतर इंग्लिश ग्रंथकार ह्यांनी प्रसिद्ध रस्त्यावर लूट करणाऱ्या लोकांच्या अनेक कृत्यांचे वर्णन केले आहे; व ह्या कायद्यांत न सांपडणाऱ्या भामट्यांच्या कृष्णकारस्थानांचा पुष्कळच परिस्फोट केलेला आहेव त्यांतच अशा लोकांनी औदार्य व सुशीलता दाखविल्याची मोठी चमत्कारिक उदाहरणे आहेत. ती सारी सांगत बसण्यास अनुकूलता नाही. तथापि त्यांतील एक चमत्कारिक गोष्ट मासल्यासाठी दाखल करतो. - इंग्लंडमध्ये इ. स. १८७६ मध्ये आगष्ट महिन्यांत एक बाई घोड्यावर बसून डब्लीनजवळच्या फिनिक्सनामक बागेत एका चाकरासहवर्तमान सहल करीत असतां एक मनुष्य पायाने चालत आला. त्याने सफेत पोषाख करून डोकीला रेशमी जरीची टोपी घातली होती. तो त्या बाईच्या जवळ आला, आणि त्याने एकदम तिच्या घोड्याचा लगाम धरून 'तुमच्याजवळ जे काय असेल ते टाका ह्मणाला.' तेव्हां त्या बाईने तिच्याजवळ असलेल्या सव्वीस गिनी त्याच्या हवाली केल्या. ते नाणे ठेवण्याकरितां त्या गृहस्थाने एका