या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३५ अंक ६ वा. जून १८९८. लली तर आपण राहतों ह्या भूगोलाचे विशाल उदर व्यापून जाईल, इतकी माशांची संख्या होईल." , स्क्लेडन, जलतंतूंच्या उत्पत्तीविषयीं येणेप्रमाणे लिहितो:-" एका वर्षांत दोनशे अंडी घालणारी एखादी कोंबडी पाहिली झणजे आपणांस केवढें आश्चर्य वाटते, आणि तेच जर एखाद्या माशाची अंडी हजारोंच्या हजारों दृष्टीस पडली, तर आपणांस केवढे बरें आश्चर्य वाटेल ? देवमासा आपल्या उपजीविकेचे साधन ज्या लहान लहान मासळ्या, त्याच आधीं हजारोंच्या हजारों गिळून फडशा पाडतो. ग्रीनलंडच्या किनाऱ्यावर १०।१५ मैल रुंदीचा व १५०।२०० मैल लांबीचा समुद्राचा भाग, बहुधा नेहमीं, प्रेडसी नामक लहान लहान जलस्थ जीवांनी बुजबुजलेला असतो. अशा त-हेचे प्राणी एकच घनफूट जलभागावर १.१०,५९२ इतके पसरलेले असतात. आणि अशा एका पट्टीवर-रांगेवर-निदान नव्वद हिश्शांनी १,६००,०००,०००,००० इतके प्राणी असतातच असतात. ___ अशी जेथें अनर्थ वाढ आहे, तेथें मनुष्याच्या आहाराने कितीसा संहार होईल ? तर मनुष्ये मत्स्याहार करतात ह्मणूनच हा होणारा अनर्थ टळतो, व या कारणासाठीच मत्स्याहार करणे अवश्य आहे, हे ह्मणणे अगदींच चुकीचे होईल. तर अशा प्रकारची प्राणिमात्रांची होणारी भयंकर वाढ व तिजपासून होणारा अनर्थ ही निवारण्याकरितां, परमेश्वरच निरनिराळे प्रसंग व कारणे योजतो व त्यांचा संहार करतो, ही त्याची कृपा समजून, त्याचेच गुणानुवाद गाणे फार चांगले. पुस्तकपरीक्षा. कन्याविक्रयदुष्परिणाम नाटक हैं लहानसें पुस्तक व निबंध रा. रा. मोरो विनायक शिंगणे व बाळकृष्ण बापू आचार्य, मुंबईचा वृत्तांत, माझे प्रिय पुस्तक अथवा व्यवहारदर्पण, यशवतविजया नाटिका, सुलभ प्रसूति, ऋणविमोचन वगैरे पुस्तकांचे कर्ते ह्यांनी तयार करून ते श्रीमंत सरकार गायकवार्ड ह्यांच्या आश्रयाखाली छापले आहे; व त्यास दक्षिणाप्राइज कमेटीकडून बक्षीस मिळाले आहे. शिवाय रावबहादुर हरिलाल एच. ध्रुव, नवसरी