या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. येथील जज्ज, तसेंच न्यायमूर्ति रावबहादुर महादेव गोविंद रानडे ह्या उभय न्यायमूर्तीनी हे पुस्तक वाचून पुस्तककर्त्यांस " काही योग्य सूचनाही केलेल्या आहेत." ह्याशिवाय दिवाण बहादुर मणीभाई जसभाई, शेट मूळजा जठा इत्यादि पांच पंचवीस श्रीमान् गृहस्थांची आश्रय दिलेली यादी वगैरे आहेच. इतक्या सर्वांचा व मुंबईचा वृत्तांत वगैरे पुस्तकाचे कर्ते ह्यांनी हे लाहल असा विचार मनांत आणला झणजे सदरह पुस्तक में एक अति उत्तमपिकी असून मोठे रसभरित व चटकदार असावे, अशी सहज कल्पना हात.. आचार्य व रा. शिंगणे यांसारख्या मेहनती व दक्ष ग्रंथकाकडून खरोखरच उत्तमच पुस्तक तयार व्हावयाचे, पण वास्तविक प्रकार तसा नाही. हे पुस्तक साधारण मध्यम पुस्तकांपैकीच आहे. नाटक ह्या दृष्टीने विचार केला तर त्याची योग्यता बऱ्याच कमी प्रतीची ठरेल. कारण, नाटक ह्या नावाला शोभण्यासारखी त्यांत दृश्यकाऱ्यास अनुसरून रसांची व गुणांची योजना केलेली दिसत नाही. मनोरंजकता आहे. पण ती फारच थोडी आहे. दोन तीन पात्रांच्या आंगचे गुण स्वाभाविक रीत्या वठले आहेत येवढाच काय तो गुण नावाजण्यासारखा आहे. शिवाय 'कन्याविक्रय हा विषय अत्यंत करुणास्पद असल्यामुळे हे नाटक उपयुक्त हे तर सर्वांसच कबूल केले पाहिजे. आतां ह्यांत काय काय उणिवी आहेत त्या संबंधाने विचार करू. एकच अथ दोघांदोघांनी किंवा तिघांनी कसा लिहावयाचा ह्याबद्दल आझास वारवार विस्मयच वाटतो. त्यांतन एखादें पुस्तक भाषातररूप - एकदोघांनी मिळन संपविलें हाटले तर बरेंच शोभण्यासारखे आहे. [ संपविला, व उत्तरार्ध दुसऱ्याने संपविला तर काम लौकर आपरस्परानी परस्परांची कृति एक वेळ नजरेखालून घातली, तर होण्याचा संभव आहे. तरी सुद्धा एकाची भाषाशैली दुसयास साधणे कठीण; पण स्वतंत्र नाटकासारख्या स्वरचित विषयांत दाघाना दापविमाग कसे करावयाचे १ किंवा हिस्सेरशी तरी कशी पाडावयाची ? एक वाक्य एकाने लिहून, दुसरें दुसऱ्याने लिहावयाचे, कां एक प्रवेश एकाने लिहून दुसरा दुसऱ्याने लिहावयाचा, कां एका पात्राचे भाषण एका व्यक्तीने लिहून, दुसऱ्या पात्राचे भाषण दुसऱ्या व्यक्तीने लिहावयाचे, कां काय करावयाचें ? ह्याचा आमच्याने तर उलगडा होत नाही. मग प्रस्तुत नाटकांतील भाग, रा. शिंगणे यांनी कोणता लिहिला, व रा. आचायांनी कोणता