या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. लिहिला, हे त्यांचे त्यांसच माहित. तो गुलदस्त इतरांस समजण्यास काही साधन नाही. असल्या हिस्से रशीत सत्कीर्तीची ओढाताण, आणि अपकीर्तीची ढकलाढकल करण्याला मात्र चांगली संधि असते ! असो. तर अशा प्रकारे एकाच छोट्याशा पुस्तकावर दोन दोन गृहस्थांची नांवें घालण्यांत, किंवां परस्परांची मदत घेण्यांत कोणताच अर्थ नाही. येवढेच नव्हे, तर त्यापासून किंचित् कमीपणाच येतो हाटले, तरी सुद्धां बाध येणार नाही. । इतर गुण विशेष नसले, तर भाषापद्धति तरी मनोरम पाहिजे. परंतु प्रस्तुत नाटकांतील शब्द व वाक्ये तर जणू काय विलायतेहून आणलेली दिसतात. त्याच्या मासल्यासाठी खाली दिलेली वाक्ये पहावीत: 'मध्यस्थि लोक'-ह्यांत मध्यस्थ असें पाहिजे. 'कांहीं गुणशेष असल्यास सर्वांचा गुणलेश आणि प्रस्तुत पुस्तककारांचा 'गुणशेष !' 'मंडळी हवी लागेल.' ध्यानात ठेवण्यासारखे वाक्य ! 'तुझी पण बरीच खोडकी जिरवीन एका क्षणांत.'-तुझी खोडकी (१) एका क्षणांत जिरवीन, असें वाक्य केले असते तर रागाच्या आवेशाचे थोडेसे स्वरूप तरी व्यक्त झाले असते. पण बरीच' हे निरर्थक शब्द ढकलल्याने बेंगरूळपणा मात्र उत्पन्न झाला. 'मी ह्मणून नाहींचा हो ह्मणावयाची नाही.'-'चा' च्या ठिकाणी 'चें' पाहिजे, ह्मणजे सरळ वाक्य झाले. 'भेटी घाटी खाल आणि जावयांत गर्क व्हाल!'–कितीपण सरळ आणि शद्ध वाक्य ? 'घाटी' ते काय ? जावयांत तें ग कसे व्हावयाचें ? जावईपणांत झटले असते, तर त्यांत राम होता. 'पण कोणी तरी मामेलेक उपयोगी पडावयाचा होता ?'-'मायेचा पूत' असें ह्मणण्याचा परिपाठ आहे. ह्मणजे त्यांत एक प्रकारची ऐट साधते. 'बच्चा' हे संधान जुळवलेस तर तुला पन्नास रुपये हे ठेवलेच आहेत.'वाक्यांत मजा नाही; शोभा नाही; आणि बच्चा शब्द कोठे वापरावा, ह्याचे तारतम्य नाही. 'ह्याची ददाती नाही.' ददात हा मूळ शब्द. 'ददाती' नव्हे ! 'तुही दोघेही समवयस्कर होतींत.'-मराठी भाषेचे निष्कलंक स्वरूप तें १८