या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १३९ आमच्या भते वरील वाक्यापुढे त्याची कांहींच मातब्बरी नाही ! ह्या वाक्यांत पुस्तककर्त्यांना काय सांगावयाचे होतें तेंच आझांला समजत नाही. 'हे शंख जर वेदविद्येच्या पाठीमागे लागते तर असले घाणेरडे विचार कधीही त्यांच्या मनांत आले नसते. घाणेरडे विचार कोणते ? तेंच मुळी समजत नाही. कन्याविक्रयाचे की काय? तसे असेल तर 'विंग्रजी विद्येचा गोंधळ खराच ! 'विंग्रजी' विद्येला भिकारी हाणतो, व तिने का कोठें तेज येते? असे विचारतो तो कोण ? तर अव्वलपासून अखेरपर्यंतही ज्याचें कोठें नांव नाही व तो कोण ह्याचाही उल्लेख नाही, असा नारायण भट! बिचान्याची कल्पनाशक्ति व विचार उदात्तच खरे ! कोणत्याही नाटकांत प्रथम पात्रे देऊन त्यांचे संबंध दाखविण्याची चाल आहे. पण तिला ह्या उभय नाटककर्त्यांनी तर अजिबात फांटा दिला आहे. आणखी, सर्वांत मजेची गोष्ट ही की, ह्या उभयतां पुस्तककाँस छापखान्याने जी कांही मदत केली आहे ती तर अगदी मनोभावेंकरून! व्हस्व दीर्घ ह्यांचा मुळीच भेद ठेवला नाही; अनुस्वाराची क्षिति बाळगली नाही; आणि रूपांची पर्वा केलेली नाही. वर्षामध्ये तीनशेपासष्ट जरी समारंभ झाले, तरी प्रश्नचिन्ह झणून तोंड दाखवावयाचे नाही, हा तर बाणा ! मग ही मंडळी पुस्तककांकडे शिल्लक नव्हती, कां छापखान्यांत दुर्भिक्ष होतें कोण जाणे ? आणि यदाकदाचित् ही प्रश्नचिन्हांची स्वारी तोंड दाखवायाला आलीच, तर अशा सुमुहूर्तावर यावयाची की, त्या वेळेस कोणत्याच चिन्हाची जरूरी नाही !! अशा पुस्तकास न्यायमूर्ति रावबहादुरासारख्यांनी "I find it very interesting. The subject has been very ably and instructively treated," असा अभिप्राय दिलेला पाहून मोठा चमत्कार वाटतो. न्यायमूर्तीसारख्या महात्म्यांचे अंतःकरण नेहमींच दयेने आई असते; व याचकाप्रीत्यर्थ आपल्या पदरास झीज लागली तरी सुद्धां ते सोसण्यास तयार होतात. मग चार ओळींच्या अभिप्रायाने जर एखादा ग्रंथकार तृप्त होत असेल, तर ते थोडक्यासाठी त्याचा अवमान कां करतील ? असले अभिप्राय ग्रंथाबद्दलचे नसून ग्रंथकारांविषयींचे होत (१) पण अशा सढळपणाने उभयतांचे माहात्म्य कमी होते, व 'टक्काशेर भाजी, टक्काशेर खाजा' असा प्रकार जनांस वाटतो. ही गोष्ट ग्रंथकाराने व अभिप्राय देणारानेही ध्यानात ठेविली पाहिजे. रावबहादुर ध्रुवांनी न्यायमूर्ति रानड्यांप्रमाणे जर काही ग्रंथकारांस सूचना केल्या असत्या, तर त्यांचा रसिकपणा आणि थोरवी चांगली व्यक्त झाली असती. वरील