या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. अभिप्राय झणजे ग्रंथकारांच्या आत्मप्रौढीच्या जल्पनांचीच एक तन्हा होय. स्वतःसिद्ध ग्रंथाच्या योग्यतेवरून लोक जी कीर्ति गातात, ती निष्कलंक असून अत्यंत भूषणावह होते. 'फाटकी गोधडी' 'तुटकी वाकळ' 'फटवे वैद्य' 'भुरटे वकील' इ. इ. पुस्तकांचे ह्मणे कर्ते ! अशी नामावळ पुढे मांडणे झणजे गोवयाचे, राखेचे व कोळश्याचे ढीग दारांत रचून 'श्रीमंत' 'नवकोट नारायण । झणून ढोलगें पिटविण्यापैकीच उपहासास्पद होय. अशा पोरचेष्टांनी असलेल्या संपत्तीकडे सुद्धा कोणी ढुंकून पहात नाही. तथापि साधारणपणे पाहिले तर, हे पुस्तक टाकाऊपैकी नव्हे हे आनंदाने सांगितले पाहिजे. घेण्यासारखे गुण ह्या लेखांत बरेच आहेत. गोविंदरावाची ठकबाजी व लफंगेपणा ध्यानात ठेवण्यासारखा; हरभटाची चिकाटी अनुभविक; नायकिणीच्या गाण्याचा थाट, मारवाड्याच्या भाषणाची नक्कल ही अगदी हुबेहुब व मनरिजक; पोलिस व सेशनकोर्ट ह्यांचा देखावा कोणाचेही क्षणभर समाधान केल्यावांचून रहाणार नाही. शेवटी निबंध किंवा व्याख्यान आहे, त्यामध्ये शास्त्ररीत्या हा विषय चांगलाच प्रतिपादन केला आहे. ह्यावरून सदरहू पुस्तकांतील लेखांत गुणांचा अंश अधिक आहे हे उघड आहे. व विषय तर असा की, त्याची चर्चा होईल तेवढी बरी. ह्यास्तव सदरहू पुस्तक सवडीप्रमाणे संग्रह करावें, किंवा निदान एक वेळ वाचावें हे इष्ट आहे. पुस्तककत्याना सदरहू पुस्तकाच्या १५० प्रति केरळकोकिळा'च्या वाचकांस बक्षीस दण्यासाठी दिल्या आहेत. ह्याकरितां जे कोणी वर्गणीदार मागील बाकी पूज्य करताल, किंवा वर्गणी आगाऊ देऊन नवे वर्गणीदार होतील, त्या प्रत्येकास एक प्रत आमच्या केरळकोकिळच्या मुंबईच्या ऑफिसांतून (ज० म. उजर, दुकान रामवाडी मुंबई यांजकड़न ) बक्षीस मिळेल. प्रती वाटा. वयाच्या खलास झाल्यानंतर प३ अर्थातच हे बक्षीस मिळणार नारा सदरहू संधि आमचे वाचक फुकट जाऊ देणार , नाहीत, होईल तितकी त्वरा करतील, अशी आशा बाळगन व उभय ग्रंथकारांनी आमांवर व आमच्या वाचकावर येवढी मेहरबानी केल्याबद्दल फार फार उपकार मानून दुसरीकडे वळतो, मराठा भाषेची लेखनपद्धति–हा षोडशपत्री निबंध रा. रा. काशिनाथ सान, रामचंद्र परशुराम गोडबोले, व शंकर रामचंद्र हातवळणे, पुणेह्यांनी प्रसिद्ध करून बऱ्याच लोकांकडे अभिप्रायार्थ पाठविला अहे, हा निबंध थोडक्यांत परंतु मोठ्या मार्मिकतेने व शोधक बुद्धीने लिहिला आहे. आणखी,