या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

C2:22 अंक १० वा. अक्टोबर १८९८. राहे कांब सदा सुरेख लवली, आधीच त्याची किती रे शोभेल कशी खरोखर तरी, होतां टणत्कार ती ॥२३॥ असे रोंख ज्याचा सदा नीट एक कुशाग्रे कसा युक्त तो बाण देख । तयाला असे नांव बा सत्यवाण घडेना इजा की भल्यालागि जाण ॥ २४ ॥ अशी आयुधे घेउनी वीर सिद्ध कराया उभा संकटालागि युद्ध । करी नित्य सांभाळ सर्वांजणांचा किती वीर खंबीर बा हा मनाचा ॥ २५ ॥ हा मोठा गज यास गर्व ह्मणती, हा फार उच्छंखळ बांधोनी दृढ ठेविली ह्मणुनियां, सद्बुद्धिची सांखळ । शुंडादंड कसा प्रचंड फिरवी, उन्मत्त कैसा दिसे मी मी सुंदर दांडगा सकळिकी, ह्याला असे हे पिसें ॥ २६ ॥ ह्याचे बंधन सोडितां क्षणभरी, राहे न ठाणावरी झाडे मोडुनि झोडुनी सकळिका, हा फार मस्ती करी । युक्तीने चढुनी तयावर करी, सद्धोध हा अंकम घेवोनी गजगंड टोचुनि झणा त्याला करावा वश ॥२ दोघे झुंजति मल्ल हे बघ तरी, आहेत जे शेवटी हाते ठोकुनि दंड हे कवळिती, घालोनि कंठीं मिली। नेटानें हटवू भिडूस ह्मणती, रटोनि जेठी मनीं कीर्तीने नटवू, स्वदेह पटवू, साक्षी बळाची जनीं ॥२॥ आहे मत्त गजापरी जड बहू, जो धुंद ऐसा दिसे दृष्टी अंध, असोनि नेत्र बरवे, देखे न कांहीं कसें। ज्ञानें जो मतिमंद काळ दवडी, झोंपेंत जो वाउगा नामें आळस पीडितो बहुजणां, तो फार बा दांडगा ॥ २९ ॥