या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९८. १४१ मराठी भाषेविषयी आस्था, कळकळ व सरलता ही फारच तारीफ करण्यासारखी आहेत. मराठी भाषेमध्ये कितीएक शब्दांची रूपें अनेक लोक अनेक प्रकाराने लिहितात; -हस्वदीर्घाच्या संबंधाने मतभेद करतात; कित्येक शब्दांवर कोणी अनुस्वार देतात, कोणी देत नाहीत. ह्यामुळे फार घोंटाळा होतो. ती अडचण दूर होण्यासाठी शब्दांस कांही ठरीव नियम असावेत हे ह्यांचे हणणे आहे. व ते कसे असावेत, ते त्यांनी आपल्या मताने सुचविले आहे. तरी त्यांत कांही फेरफार असूं नये, किंवा तेच प्रचारांत असावेत असाही त्यांचा दुराग्रह नाही. पण शिष्य, शिक्षक, ग्रंथकार, वर्तमानपत्रकार, व सामान्य लोक ह्या सर्वांस हितावह होईल अशी कांहीं निश्चित पद्धति असणे मात्र त्यांस अत्यावश्यक वाटते. आतां हा हेतु स्तुत्य आहे, हे तर उघड आहे. पण तो साध्य होणार कसा? येवढाच काय तो प्रश्न. कोणी डोकीस पागोटें घालतो, कोणी पगडी घालतो; कोणी रुमाल घालतो, कोणी टोपी घालतो; कानांत कोणी भिकबाळी घालतो, कोणी चौकडा घालतो; गळ्यांत कोणी गोफ, कंठी घालतो, कोणी रुद्राक्ष घालतो; आंगांत कोणी आंगरखा घालतो, कोणी कोट घालतो, कोणी सदरा घालतो; हातांत कोणी सल्क. घालतो, कोणी आंगठ्या घालतो, कोणी सल्ले घालतो; कोणी धोतर नेसतो, कोणी पाटलोन घालतो, कोणी लंगोटी घालतो; पायांत कोणी जोडा घालतो, कोणी बूट घालतो, कोणी खडावा घालतो, कोणी अनवाणीच चालतो. हे बरोबर नाही. सर्वांचे पोषाख एकसारखे असावेत; सर्वांची एकवाक्यता व्हावी; झणजे सो. यीचे होईल. ह्मणून कायमचा एक पोषाख ठरवावयास जर कोणी प्रयत्न करूं लागला, तर तो जितपत तडीस जाईल, तितपतच ह्या वरील विद्वान्त्रयाच्या ह्या खटपटीस यश येण्याचा संभव आहे. 2 अगोदर अशी एकवाक्यता होण्याला, हा निश्चय ठरविणारांच्या आंगीं कांहीं सत्ता पाहिजे, किंवा लोकांत वजन तरी पाहिजे. नाहीतर नवी पद्धति लोक स्वीकारतील कसे ? नवी सुधारणा झटली-मग ती कोणत्याही बाबतीत असो-की लोकांचा उपहास ठेवलेलाच, ह्यापेक्षां मराठी भाषेची चालू लेखनपद्धति आहे ती बरीच ठरलेली. व सुधारलेली आहे. आणि यद्यपि थोडासा मतभेत असला, तरी लोक समजून आहेत. सुधारलेल्या इंग्रजी भाषेतही लेखनपद्धति--स्पेलिंग--अनियमित असल्याचे, निबंधकारांसही जर संमत आहे, तर मराठी भाषेतील कित्येक शब्दांबद्दल त्यांस येवढें कां वाईट वाटावें? निबंधकाः