या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. द्धिमान् आहेत, आणि आह्मी मंद आहोत. ते जसे प्राणाचे घडलेले आहेत, तसेच आमीही प्राणाचेच घडलेले आहोत. प्राण समुद्रांतलेच सारे भाग; चैतन्याच्या जातीमध्ये काय तो फरक. मला जर बुद्धिमान् चैतन्यामध्ये येता येईल, तर तो माझ्याकरितां तत्काल बदलेल. मग मी तुह्मांस पहाणार नाही; तुह्मी नाहीसे व्हाल; आणि ते दिसू लागतील. ही गोष्ट खरी असल्याचे कदाचित् तुमच्यापैकी पुष्कळांस माहित असेल. चैतन्याच्या उच्च प्रतीमध्ये मनाला नेण्याचा जो सारा प्रकार, त्याला योगशास्त्रामध्ये एकच शब्द आहे. त्याला समाधि असें ह्मणतात. उच्च प्रतीच्या चैतन्याची स्थिति, मनाच्या परिपूर्ण ज्ञानाची स्थिति, ह्या सर्वांचा समाधि ह्या शब्दांतच समावेश होतो.• समाधीच्या खालच्या ज्या स्थिति. त्यांच्या योगाने आह्मांस ह्या प्राण्यांचे दर्शन हात व वस्त, ज्ञान होणे ही समाधीची अति उच्च स्थिति होय. ह्या प्राण्याच्या न निराळ्या प्रति ज्या तत्त्वाच्या बनलेल्या आहेत, त्या चिखलाचा गाळा की ब्रह्मांडांतील सर्व चिखलाचे ज्ञान झाले. खावरून आपणांस कळते की, ह्या प्राणायामांत खरें अध्यात्मशास्त्र झणजे प, त्याचाही समावेश होतो. तसेंच आपणांस हेही आढळून येईल की, जेथें या खटपट करतात, तेथे तेथे हा योगच असतो. ती खटपट झणजे प्राणापर सत्ता चालविणे. आपणांस हेही आढळून येईल की, जेथे शक्तीचा अद्भतपणा दिसून येतो तेथें प्राणाचे स्वरूप असते. वैद्यशास्त्राचा सुद्धा वा मातच समावेश होतो. आगगाडी, एंजिन कसे चालतें १ वाफेच्या द्वारे प्राण .. विजपासून होणारे नाना प्रकारचे अद्भुत चमत्कार वगैरे प्राणाशिवाय काय आहेत ? वैद्यशास्त्र झणजे तरी काय ? बाह्य साधनाना प्राण हैं मानसिक शक्तीचे स्वरूप असल्यामळे. मानसिक शक्तीनेच ताब्यात यज शकते. प्राणायामाचा जो भाग शारीरिक साधनांनी प्राण्याच्या शारीरिक स्वरूपावर सत्ता चालविण्याची जी खटपट तिला वैद्यशास्त्र असें हाणतात. आणि जो भाग मानसिक शक्तीने प्राणाच्या मानसिक स्वरूपांवर सत्ता करण्याचा करतो, त्याला 'राजयोग' असें ह्मणतात. B तिसरे प्रकरण समाप्त. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.