या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु. १२ दि016 डास. डांस हा एक सूक्ष्म जंतु असून तो कानांपाशी गुणगुणतो, व दंश करून अतिशय त्रास देतो. इतकीच काय ती ह्या प्राण्याविषयी आमांस माहिती असते. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रांतून याच्या शरीराचे निरीक्षण केले तर त्याच्यांतील अनेक अद्भुत चमत्कार दृष्टिगोचर होतात. तो एक अस्सल शिकारी आहे. त्याच्या भात्यांत तरवार, करवत, भाला, बर्ची इत्यादि फारच तीक्ष्ण आयुधे असतात. शिवाय, त्याची जी रूपांतरे होतात, ती तर फारच विलक्षण ! ह्या सर्वांवरून सूक्ष्म प्राण्यांच्या शरीररचनेतही, विधात्याने किती दूरवर दृष्टि पोचविली