या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. आहे, व केवढे अप्रतिम चातुर्य खर्च केले आहे, ह्याचा अंतःकरणांत प्रकाश पडतो, आणि त्याच्या ठिकाणी पूज्यबुद्धि वाढते. ह्यास्तव तीच हकीगत साद्यंत सांगण्याचे येथे योजिले आहे. डास हा शब्द 'दंश' ह्या शब्दावरून निघाल्याचे उघड दिसते. डांस हे काही मनुष्याच्या रक्तावर, कांहीं जनावरांच्या रक्तावर, कांहीं बारकबारिक किड्यांवर, व कांहीं फुलांतील मधावर उपजीविका करून राहतात. सर्व हवेत, सर्व देशांत, रानांत, वनांत, घरांत सुद्धा है प्राणा हिडताना, चावतांना, व घोंगावतांना दृष्टीस पडतात. ह्यांतील कित्येकांस रक्त काढून खाण्यासाठी परमेश्वराने सहा, व कित्येकांस पाच, व कित्येकांस दोन शस्त्रे दिलेली आहेत. लांब भाला असतो तो शिवाय. प्राणिशास्त्रवेत्त्यांनी डांसाचा इतिहास फारच मौजेचा लिहन वलला आहे. खरं मटले तर, डांस हा एक त्रासदायक जंतु आहे. तथापि त्याचे वर्णन ऐकणें हें एक अत्यंत मनोरंजनाच साधना तें ऐकले झणजे आपला जीव आश्चर्याने थक्क होऊन जातो. .डासाच शरीर लांबट असून नळीसारखे असते. तो विश्रांति किंवा झोप घेत असला झणजे त्याचे दोन्ही पंख एकमेकावर जाप आडव (+) फुलीप्रमाणे पडतात. हा एक त्याच्यांत-किंवा त्याच्या पंखांत ह्मणा-विशेष धर्म आहे. हे पंख, व त्याजवराल । विचित्र रंगांची जाळी, हीं सक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिली झणजे आतशयच मनोरम दिसतात. त्याच्यांतील ज्ञानतंतु, त्याच्या कडा हा अत्यंत सूक्ष्म व पारदर्शक पापुद्रयाने मढविलेली असतात. ह्यामुळे तो सर्व देखावा एखाद्या पैलू पाडलेल्या झुंबरावर सूर्यकिरण पडल्याप्रमाणे मनाला ल्हादक दिसतो. त्यांची आकृति बदामी असून पुढे शंक्वाकार असते. हे पडदे सर्व शरीराच्या भागावरही पसरलेले असतात. डासांच्या मिशा-किंवा स्पर्शेद्रियें-विशेषेकरून नरांची, परांनी युक्त असतात ह्मणजे नारळीच्या झांपाप्रमाणे त्यांस अत्यंत सूक्ष्म केंसाचे दोहों बाजूस सारखे झुबके लागलेले असतात. हें इंद्रिय बाजूस दिलेल्या आकृतींत दाखविले आहे. डांसाचे स्पशेंद्रिय.