या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १४९ अग्राची आणि त्यांची तुलना करणे ह्मणजे, सुईच्या अग्राची आणि तरवारीच्या पात्याची तुलना करण्यासारखे आहे. डांसाची शस्त्रे इतकी बारिक व तीव्र आहेत, व दंशामध्ये इतकी जबरदस्त क्रिया घडते, तर त्यापासून येवढी मोठी इजा व वेदना का होत नाही ? दंशाच्या ठिकाणी एकदम भली मोठी सूज का येत नाहीं? लहान लहान गांदीच कां उठतात ? पण खरोखर तशा दुःसह वेदना उठतील, व तशी मोठी भयंकर दुखापत होईल, तर ह्या राजेश्रींना कोणताही प्राणी, थायमोयस उभा करणार नाही, आणि बहुतकरून फांके मारण्याचीच पाळी येईल. ह्याकरितां जगन्नियंत्याने योजना केली आहे, ती केवळ अजब आहे. ह्मणजे डाक्टर डांस ह्यांनी आपल्या पोटापुरतें मांस कांढून घेतल्यानंतर ती जखम धुवावी, किंवा तींत लगेच औषध भरावें येवढी कामगिरी त्यांजवर सोपविली आहे. ती ते इमाने इतबारें बजावतात. ह्मणजे ह्याचा अर्थ इतकाच की, डांसाची जी हत्यारांची संदूक असते, तींतच एक, एका प्रकारच्या रसाने भरलेली पिशवी असते. हीच ह्या छोट्या डाक्टराची 'ड्रापिंगबॉटल' होय. प्राण्याच्या मांसाचा तुकडा तोडून घेतला, की त्या जखमेंत औषध भरावें, किंवा धुऊन काढावी, त्याप्रमाणे डांस तींत आपल्या नळींतील रसाचा एक थेंब टाकतो. पण ही योजना औषधाची आहे कींधुण्याची आहे हे पक्केपणीं सांगवत नाही. कारण, ह्या रसाच्या घटकद्रव्यांचा कोणी बरोबर शोध लावल्याचे अद्याप दिसत नाही. हा रस शुद्ध पाण्यासारखा असतो येवढे मात्र कळले आहे; आणि त्यावरून दोन्हीं कार्ये त्याजकडून होतात असे दिसते. कारण, तो पातळ असल्यामुळे जखम धुण्याचे कार्य होते, हे तर उघडच आहे. शिवाय, डांसाच्या दंशावर औषध ह्मणून जे आहे, ते पाणीच आहे. कितीही डांस चावले, कितीही मोठ्या गांदी उठल्या, तरी, त्याजवर पाणी लावावें, त्या पाण्याने धुऊन टाकाव्यात, किंवा फार तर त्यांवर पाण्याची धार धरावी. ह्मणजे तत्काळ वेदना, आग, कंडू ही नाहीशी होतात, आणि चामडी थोड्याच वेळांत पूर्ववत् होते, हा अनुभव आहे. तेव्हां त्या रसांत बहुधा विशेष काही औषधी नसून फक्त शुद्ध पाण्याचीच तजवीज परमेश्वराने ठेवलेली असावी असे वाटते. किती अपूर्व आणि अतर्षी योजना ही !!!