या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १५१ राशी बहुतेक लंब अशी असते. ह्या नळीचे तोंड, ते त्याच्या पचनक्रियेच्या नळीचें टोंक-अर्थात् गुदद्वार-होय. ह्या द्वाराच्या सभोंवार कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे लांब लांब केसांची झालर असते. त्यामुळे पाण्यांत असतांना हा अवयव फनेलाप्रमाणे दिसतो. ह्या नळीच्या शेवटाला आणि केसाळ फनेलाच्या आतल्या बाजूस पातळ, पारदर्शक खवल्यांची चार पाती असतात. ती माशांच्या कल्ल्यासारखी दिसतात. ती जोडीजोडीने बसविलेली असतात. दोन जोड्या डाव्या बाजूने निघालेल्या असतात, व दोन जोड्या उजव्या बाजूने निघालेल्या असतात. ह्या चार पात्यांना किंवा पंखांना-परस्परांपासून वेगळे होतां येते. ह्या किड्याच्या शरीराला मणके मणके असतात; आणि प्रत्येक मणक्याच्या डाव्या बाजूला एक, व उजव्या बाजूला एक, असे दोन दोन, गोंडेवजा, केसांचे झुबके असतात; आणि गळ्यापाशी, दोन वर एक खालीं असे तीन असतात. मस्तक वाटोळे व चपटें असून त्यावर पिंगट रंगाचे दोन डोळे असतात. तोंडाभोंवतीं तर केसांचे झुबके अनेक असतात. पैकी दोन पुढे आलेले असून, त्यांचा आकार हुबेहुब चंद्राच्या कोरांसारखा असतो. तोही चित्रांत दाखविला आहे. हे झुबके सारा दिवस लुव् लुव् लुव् करून एकसारखे हालत असतात. ह्याचा उद्देश, त्या प्राण्याच्या तोंडांतून पाण्याचे बारिक बारिक प्रवाह चालू रहावेत हा आहे. त्यास अवश्य लागणारें भक्ष्य-सूक्ष्मदर्शक यंत्रांतून मात्र दिसणारे सूक्ष्मजंतु-आणि मृत्तिकेचे व वनस्पतीचे अत्यंत सूक्ष्म परमाणु हे त्याच्या योगाने धरले जातात. ह्या स्थितीत असतांना, सर्पाने कात टाकल्याप्रमाणे त्याला आपली कवचे अनेक वेळां टाकावी लागतात. पंधरा किंवा वीस दिवसांत त्याला तीन वेळ कवचं टाकावी लागतात. चवथ्यांदा कवच टाकलें, झणजे मग ह्या स्थितीत त्याला फार दिवस रहावे लागत नाही. मग त्यास निराळेच स्वरूप प्राप्त होते. पहिले लांबट शरीर जाऊन त्याचा आकार आंखूड होतो. गुरें निजतांना जसे आपले पाय, मस्तक, शेपूट एकत्र करून आंगाचे गाठोळे बनवितात, त्याचप्रमाणे ह्या प्राण्याची स्थिति ह्या रूपांतरामध्ये होते. त्याच्या आंगाभोंवतालचे केसांचे झुबके वगैरे सर्व दुमडतात; शेपूट पोटाकडून वळून मस्तकास भिडतें, व सर्वे