या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. अवयव संकोचित होऊन झुरळासारखा एक प्राणी बनतो. तरी त्याला हालतां येते, व पोहताही येते. ह्मणून ह्या दुसऱ्या रूपांतरांतही तो पाण्यामध्ये सुखाने विहार करतो. - ह्या स्थितीमध्ये तो कांहींएक खात नाही. कारण, त्यास पचनेंद्रियच उत्पन्न झालेले नसते. पण एका गोष्टीची त्याला विशेष जरूर असते. ती गोष्ट ही की, वातावरणांतून श्वासोच्छास करतां यावा. ह्या दुसऱ्या रूपातरात तो आपले शेपूट वळवन मस्तकाकडे गुंडाळतो, हे वर सागितलच आहे. तेव्हां अर्थातच त्याची श्वासोच्छासाची पूर्वीची नळी ही. त्या शेपटाबरोबर गंडाळली जाऊन ती बंद होते. पण विधात्या ततूद त्याच्याही आधी! ती काय चकणार? हे दुसरें रूपांतर होण्याचा समय यऊन ठपला, की लगेच गाढवाच्या कानाप्रमाणे, ह्या प्राण्याच्या मस्तकावर दोन श्रृंगारुति कोंभ फटतात. ते पोकळ असतात. त्यान त्यास श्वासोच्छास घेतां येतो. हे कोंभ मस्तकावरच असल्यामुळे, ह्या उस पातरात तो आपले तोंड, पहिल्या रूपाप्रमाणे पाण्याकडे न कारतावर करतो, आणि त्या कोंभाची तोंडे पाण्याच्या सपाटीवर रावातावास घेतो. ह्या स्थितींतील प्राण्यापासूनच खरा डांस उ कता हळूहळू वाढत असतो. आणि वरील देहावरून आं या आळखता येतो. कारण, वरच्या बाजूने त्याच्यावर पातळ पारदर्शक चामडी मात्र असते. तथा स्थितीतून मुक्त होण्याचा समय आला ह्मणजे, हा प्राणी. पाण्याच्या सपाटीवर येतो. आणि मागचा भाग सरळ वर उंच करून आपण पाण्यावर पडतो. अशा रीतीने क्षणभर गेला ह्मणजे, श्वासोवास.पण्याच्या ज्या दोन नळ्या असतात त्यांच्या मधोमध वरील कवच किवा चामडी फाटते. आणि भराभर उकलत जाऊन त्याची लांबीरुंदी वाढते; व आंतून निघणाऱ्या नव्या डांसाचा भाग दिसू लागतो, व तो ताज्या रंगावरून सहज ओळखतां येतो. हा रंग हिरवाचार असतो. पूर्वी तो ज्या कातडीत असतो, तिच्याहून तो फार भिन्न दिसतो. पडलेली चीर मोठी होत होत एका क्षणांत तो बाहेर निघण्याच्या बेताची होते. नव्या प्राण्याचा लांबडा भाग दिसू लागतो, आणि मग मस्तक वर येते. त्या भोंकांतून वर येतांना व पुढील सर्व देह बाहेर