या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. पडतांना संपूर्ण बाहेर येईपर्यंत फारच पहाण्यासारखा देखावा असतो. ह्या प्राण्याची मुक्तता होतांना त्याला फारच मोठा धोका असतो. तो प्राणी हा वेळपर्यंत जरी पाण्यांत राहतो तरी, उपजतांच त्याला पाण्यासारखे दुसरें भयच नाही. तो जर पाण्यावर पडला, किंवा पाण्याचा त्याला स्पर्श झाला, तर आटोपलेंच! त्याची बारा वर्षे पूर्ण भरलीं ह्मणून समजावें. ह्याकरितां तो बाहेर पडतांना होईल तितका उंच उंच उभा राहतो. ह्या सर्व गोष्टी आरंभीच्या मोठ्या चित्रावरून चांगल्या लक्ष्यांत येतील. नंतर मग आपल्या शरीराचा भाग हळू हळू पुढे ओढून घेतो, आणि पुन्हा थोडासा उंच होतो. ह्या कामास वरील आच्छादनाच्या खरबरीतपणानेही त्यास चांगली मदत होते. अशा रीतीने डांसाचा बहुतेक भाग उघडा होऊन मस्तक पुढे पुढे येत जातें; आणि तो जसजसा पुढे येतो, तसतसे त्याचे मागचे कवच रिकामें पडत जाते. नंतर त्या पहिल्या कवचाची एक होडीच तयार होते, मटले तरी चालेल; आणि त्या होडीत पाणीही येऊ शकत नाहीं; आणि आले तर त्याचा नाश झालाच. डांस हा त्या चिमुकल्या होडीचं शीड बनून राहतो. मोठमोठ्या होड्या, एखाद्या पुलाखालून जाऊं लागल्या ह्मणजे आपलीं शिडे उतरतात, आणि होडी पुलाच्या बाहेर पडली झणजे ती चढवीत चढवीत पुन्हा ताठ उभी करतात. डांसही आपलें देहरूपी शीड असेंच चढवीत चढवीत अगदी ताठ करतो. पण त्याला ते कसे करता येते, आणि तो ताठ कसा राहतो, हे सांगतां येणे कठीण आहे. शिडाकडच्या भागाकडे ओझें अधिक असते ही गोष्ट खरी, पण त्या बाजूला होडीची रुंदीही मोठी असते. ज्यांना होडीत बसण्याचा प्रसंग असेल, त्यांना होडीचा पुढचा भाग किती दबलेला असतो, आणि तिकडच्या कडा पाण्याच्या किती जवळ असतात, हे सांगणे नको. डांसाचा हा जन्म पाहतांना त्याचे प्रारब्ध मोठे बलवत्तर असें वाटल्यावांचून राहत नाही. आणि त्यांतूनही वारा सुटला असला, व पाण्याला खळबळ असली, झणजे तर फारच. पण कित्येकांच्या मनांत अशी कल्पना येईल की, त्या लहान जीवाला हवा काय करणार ? फार तर त्याची होडी ह्या कडेहून त्या कडेला नेत असेल. तरी, ही एक २०