या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. त्येक झाडांचे वेल दोरखंडाप्रमाणे लांबच लांब पसरलेले असतात. कित्येक झाडांवर ताडपत्राप्रमाणे वर्तुलाकार चक्रेच गजबरलेली असतात. ह्या सर्वांचा विचार केला ह्मणजे आपल्या चर्मरूप इंद्रियांचे ज्ञान किती संकुचित आहे, व ज्ञानेंद्रियांचा पल्ला केवढा अगाध आहे ह्याची थोडी तरी कल्पना मनांत आल्यावांचून रहात नाही. लोकोपयोगी कृत्यांत व उद्योगधंद्यांत मानापमान घंटीस लावला पाहिजे. अभंग. मानापमानाचें गोवें। अवघे गंडाळनि ठेवावें ॥मागण (तुकाराम.) साधारणपणे दानियेत अशी चाल आहे की, आपण मोठे आहा, - मान श्रेष्ठ प्रतीचा आहे. आपल्यापेक्षा कमी प्रतीचे लोक है । वन मदत करणे हैं अगदी कमीपणाचे मानहानीचें, नीच व हलक काम तेक मनष्यांस वाटत असते. पण ही त्यांची केवढी बरे चूक आर . माठ झालों सरकारदरबारात आपली मानमान्यता होऊ लागला, - पाइ लागला, व लोकांतही चांगले वजन बसले, तर आपण आपल्यापेक्षा कम प्रतीच्या हाताखालच्या लोकांच्या काडीमात्रही उपयोगास पडूं नये काय ? त्यात हातभार लावू नये काय ? हाय ! हाय ! सगळीच जर एक जातीची मनुष्यच आहेत, तर त्यांच्यामध्ये हा भेद-मी मोठा व तो लहान, मी श्रीमंत व ती ग. ना डाव तो हलका हा तिडा कां बरें असावा ? परमेश्वराने मानवी प्राण्यास इतर सर्व-भूचर, खचर, जलचर-प्राण्यांहून बुद्धि, ज्ञान, वाचा, चाप वगैरे अमोलिक देणग्या बहाल केल्या आहेत. त्या कोणास कमी, कोणास जरा जास्ती, कोणास परिपूर्ण अशा कमीजास्ती प्रमाणाने प्रत्येकाच्या ठायीं वास करीत असल्याकारणानें, कोणी उंच पदास पोचतो, कोणी त्याच्या जरा खाला राहतो, कोणी अगदी शेवटच्या पायरीवर लोळत पडतो. तरी जे उच्चपदाप्रत पाचले आहेत, त्यांनी इतरांची मुळीच काळजी घेऊं नये काय ? आपल्याच वैभवांत, आपल्याच ऐषआरामांत, व आपल्याच आयतेंत गर्क होऊन जावें काय !