या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १५९ गरीबांकडे मुळीच पाहूं नये ? छे! छे ! थोर लोक जर इतरांकडे कानाडोळा करतील, त्या बिचाऱ्यांची वास्तपुस्त न घेतील, जेथे तेथे त्यांस पायधुळी लोटतील, तर त्या बिचाऱ्यांची उन्नति कशी व्हावी ? व प्रत्येक देशांत बहुतेक अशाच लोकांचा भरणा जास्त असल्यामुळे, त्यांची जर अशी अवस्था झाली, तर देशाचे तरी कल्याण कसे व्हावें ? तर थोर लोकांनी असे करणे हे त्यांस चांगले नव्हे. -बरें, ह्या भेदभावाचें मूळ कशास जखडले आहे ? मानापमान हा ह्याच्या मुळाशी आहे. हे एवढे मूळ तोडून टाकले तर सर्वांचे कल्याण होईल. पण हेच मुळी कोणास तुटत नाही. त्यामुळेच देशाची हानि होते. शिरोभागी दिलेली तुकारामाची उक्ति फार प्रगल्भ आहे. मान अगदीच सोडून द्यावा, असे त्याचे ह्मणणे नाही. जेथें राखावयाचा, तेथेंच-योग्य ठिकाणींच-तो राखला पाहिजे, हे खरे; 'पायींची वहाण पायीं बरी' हेही तत्व विसरता कामा नये हे खरे; सांखळी पायांतच शोभेल, हातांत घालून कोपरापर्यंत चढविली तर विशोभित दिसेल, शिवाय चार चौघे हांसतील हे खरे; व शिरोभूषण तें शिरोभूपणच, तेथे इतर भूषणें धारण करणे हे गैर, ह्या कविवचनाची पायमल्ली करूं नये हेही खरेच. यजमानांच्या लोडाशी तीन कपड्यांचे आचार्य-आचारीबुवाखुशाल झोंकांत टेंकून, हातवारे लोकांपुढे यथेच्छ नाचवू लागतील, तर त्यांस चवदाव्या रत्नाची चमक दाखवून, जरब देणे अगदी जरूर, हेही खरेंच. ए. खादे हरीचे लाल अद्वातद्वा तोंड सोडून, पाणउतारा करतील, तर त्यांची यथायोग्य पूजा केली पाहिजे हेही खरेंच, त्याविषयी काही ह्मणणे नाही. तथापि इतरांवर दया करण्याची पाळी येऊन ठेपली असतां, किंवा गरीबांचे ओझें हलकें व्हावे-उतरावें-ह्मणून हात लावण्याचा प्रसंग प्राप्त झाला असतां, किंवा एखाद्या लोकोपयोगी कृत्यांत किंवा एखाद्या धंद्यांत उदारपणाने साह्य, मग तें द्रव्यद्वारा किंवा शारीरिक, करण्याची वेळ आली असतां, कांकू करणे, मागे घेणे, किंवा शेवटची मानापमानाची जाहिरात ठोकणे-आपली प्रतिष्ठा कमी होते ह्मणून टाहो फोडणें-हे मात्र फार लाजिरवाणे होय. एखादा मोळीविक्या एखाद्या हमरस्त्याने जात असावा, व त्याने एखाद्यास " दादासाब! रावसाब ! वाइच वझ जड झालंया उतरू लागावो धनीसाब" ह्मणून डोकीवरच्या जडभाराने, टांगलेल्या मानेनें, काकुळतीने-दीनवाण्या स्वराने, त्या वेळेस रस्त्यावरून जाणान्या येणाऱ्या शेकडों माणसांपैकी एखाद्यास विचारावें ? मग उगीच मजा पहावी. कोणी एखाद्याने त्याचा स्वर ऐकून, जे