या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८. २३३ हाताची कटुता मिळेल भय हे, मेवेकरी ओंगळ घ्यावें मान्य करोनि तेंहि सकलीं, सारा धुवोनी मळ ॥ ३५ ॥ लोकोत्तर चमत्कार. सुरवंटांवर फिर्याद ! 'सुरवंटांवर फिर्याद' हे सदर पाहून आमचे वाचक प्रथमतः ही कांहीं तरी एक 'पंचोक्ती'सारखी थट्टा असेल अशी कल्पना करतील. किंवा कोणी 'केरळकोकिळ हा गप्पा मारणार मोठा वस्ताद आहे. असेंडी ह्मणण्यास चुकणार नाहीत. परंतु सुरवंटांसारख्या किड्यांवर प्राचीन काली कित्येक राष्ट्रांमध्ये न्यायासनासमोर फिर्यादी होऊन त्यांचे कै. सल्ले होत होते, ही गोष्ट सरकारी कागदपत्रांवरून सिद्ध होते. आणि ह्या गोष्टी सुद्धां युगांतरीच्या नव्हेत, तर गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत त्या अमलांत होत्या. हे खालच्या विलक्षण खटल्यावरून प्रत्ययास येईल. 'चीनदेशाचे वर्णन-किंवा इतिहास' आमच्या वाचकांस आमीं सादर करतांना त्या देशांतील सांप्रतचा न्यायाचा प्रकार सांगितलाच आहे. एखाद्या गांवांत सांत आली, तर ती अमक्या अमक्या देवांनी आणली ह्मणून ठराव करणे, त्यांच्यावर वारंटे काढणे, त्यांच्या देवालयांची जप्ती करणे, त्यांस बेड्या ठोकणे, न्याय कोण करतो ते दृष्टीस पडं नये ह्मणून मूर्तीस पिंजऱ्यांत आणून उभी करण्यापूर्वी तिचे डोळे काढणे, व शेवटी त्यांस नेऊन पाण्यात बुडविण्याचा ठराव करणे इयादि गोष्टी त्या देशांत राजरोस चालतात. तेव्हां सुरवंटांवर फिर्यादी व्हाव्यात ह्यात विशेष आश्चये मानावयास नको. यानी अशी आहे:___मारियन शहरानजीक, सेव्हायमध्ये सेंट जारी गांवांत द्राक्षांचे मोठमोठाले मळे होते. आणि मारियन शप नांवाचा जो धर्माध्यक्ष तोही तेथेच राहत असे देवस्थानासंबंधीही काही बागा असत. इ. स. १६४६ मध्ये ह्या बागांमध्ये अतिशय सुरवंट उत्पन्न झाले, आणि त्यांनी त्या द्राक्षांच्या वे.