या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. १६१ हूं ! उचला ! उचला, द्या वर चढवून, द्या झोंकून, तें पहा चाललें वर, हूं ! अरे ! लावाकी नेट, हूं ! जाऊं द्या वर, अरे! काय तरी माणसें ही !” असें एकसारखे हुकुमाचे ओरडणे-नव्हे त्याचा कंठशोष चाललाच होता. तो तिकडूनच एक अगदी साधा पेहराव केलेला कामगार मनुष्य घोड्यावर बसून चालला होता. त्याच्या तें नजरेस पडतांच, त्याने त्या नाइकाकडे वळून हाटले “आपण कां त्या तुळवंडास हात देऊन, त्यांस थोडीशी मदत करीत नाही ?" तेव्हां नाइकानें चकित मुद्रा करून गरकन् मान फिरवून आपल्या लष्करी थाटाने उत्तर दिले "का ह्मणजे, नाईक तो मी." "हं ! हं! नाईक ह्मणतात ते आपण! आपणच काय ? नाईकसाहेब, मला तर मग हे माहीत नव्हते.” असें ह्मणून त्या कामगाराने आपल्या डोकीवरची टोपी काढून, मोठ्या नम्रतेने त्याच्या इभ्रतीस शोभेसा लवून मुजरा करून "तर नाईकसाहेब, अपराधाची माफी असावी" ह्मणून त्याची माफी मागितली; आणि आपण स्वतः घोड्यावरून खाली उतरून त्या शिपायांस त्या गृहस्थाने अगदी कपाळावरून घामाच्या धारा लागे तोपर्यंत, व अंगांतील कपडे भिजून चिंब होईपर्यंत, तें चढविण्यास मदत केली. १. अशीच एक गोष्ट कै. श्री. खंडेराव महाराज गायकवाड यांजविषयींची सांगतात. ती येथे आमच्या देशांतील राजाची ह्मणून खाली देतो. ती अशी:- एकदां महाराज शिकारीचा पोषाख करून, सडेच शिकारीस जात असतां, वाटेंत कोणीएक वृद्ध बाई, काही जड ओझें डोक्यावर घ्यावयाचे होते, ह्मणून त्या वाटेनें एकाद्या जाणाऱ्या माणसास हात लावावयास सांगण्याच्या विचारांत होती. तिला तो एक साधाच मनुष्यसा वाटून, तिने झटलें “दादासाब, वाइच वझ उचलं लागावो.” असें ह्मणतांच, महाराज शरीरकाठीनें भक्कम असल्याकारणानें, त्यांनी झटकन् एका हातानेच ओझ्याची पाटी उचलून डोक्यावर दिली व आपण चालते झाले. दुसरे दिवशी त्या बाईला वाड्यांतून बोलावणे गेलें. बाई, वाड्यांतून बोलावणे कां आलें, ह्मणून गोंधळांत पडली व तेथे गेली. तों महाराजांनी तिला दयाळूपणाने सांगितले की, “माझा हात तुझ्या पाटीला लागल्यावर, तुझी दरिद्रदशी रहावी, हे मला बरोबर वाटत नाही. सबब आजपासून तूं ओझी वाहूं नको. तुला दरमहा दहा रुपयेप्रमाणे देणगी देण्यांत आली आहे. आतां स्वस्थ घरी बैस. कष्ट करूं नको.” त्या बाईलाही काल हात लावलेले, ते हेच महाराज, हे पाहतांच मोठं आश्चर्य वाटले, तिनें क्षमा मागितली; व गरिबास देणगी दिल्याबद्दल आनंद वाटून निघून गेली. ह्यावरून महाराजांची गरिबांविषयी किती ही कळकळ ! केवढी ही उदार बुद्धि ! व काय ही दयालुत्वाची देणगी! २१