या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. प्रयत्न चालविला होता, त्याचा लोकांनी कसा काय उपहास केला, लोक कसे . बरे त्यास हंसले ! पण खुद्द राजानेच जेव्हां झटले की, बटाटे खाणे चांगलें, तेव्हां सगळ्या निंदकांची तोंडेंच बंद झाली, आणि जो तो बटाटा कसा काय लागतो, हे चाखून पाहू लागला. आणि अशा रीतीने सर्व देशभर हळू हळू बटाटे लावण्याचा क्रम सुरू झाला. इंग्लंदांतील लोकांची उद्योगशीलता इतकी वाढण्याला देखील अशाच प्रकारचे कारण असले पाहिजे, आमचे हल्लींचें आंग्ल राजकुल अशाच प्रकारे उद्योगशीलतेने ओतप्रोत भरलेले आहे. तेथें ऋद्धि सिद्धि दासी होऊन, जणू काय पाणी भरीत आहेत. आमच्या मलिकामाआझमा दयाळू चक्रवर्तिनी विक्टोरिया महाराणीसाहेब ह्या तरी उद्योगी काय कमी आहेत ? आमच्या इकडच्या काही राजेरजवाड्यांना राज्याधिकार मिळाला की, अल्प ऐश्वर्य का असेना, तरी नानात-हेचे विलास, सारंग, ऐषआराम ह्यातच गुंग राहावयास पाहिजे; पण आमच्या प्रजाजनांच्या केवळ जननीच अशा महाराणीसाहेब, ह्यांना अचाट शक्ति, अफाट राज्य, अपार वैभव, भरपूर संतति इतकें यथानुकूल असतांना, तशा प्रकारचे विलास, छः ! छे:! त्यांचे तर नांवच नको, उलट त्यांस नानाप्रकारच्या कला साध्य कराव्याशा वाटतात. मग कितीही हलक्या प्रतीची ती कला असो, ती साध्य करावयाचीच. त्यांस कपड्यांस तूण घालावयाचा धंदा मनापासून आवडतो. युवराज प्रिन्स ऑफ वेल्स हे बाल्यावस्थेपासूनच स्टाकिंग तयार करावयास शिकले आहेत. त्यांचे पुत्र ड्यूक ऑफ यॉर्क ह्यांनी दोऱ्या वळविण्याचा अभ्यास केला आहे. अशा त-हेने हे राजकुल कलांचे भोक्ते, पुरस्कर्ते आहे. एकंदरीत धन्य त्या राजकुलाची! असे असून आह्मी-त्याचीच हिंदस्थानांतील प्रजा-पहा कसे आहों ते! पूर्वा असे पुरुष नव्हते असे नाही. ज्यांनी केवळ प्रजाजनांच्या हिताकरितां राज्यसुखावर लाथ मारिली, व जे केवळ सुतार, मजूर वगैरे कमी प्रतीच्या लोकांसारखे खपले, असेही पुरुष इतिहासपटावर विराजमान आहेत. इंग्लंडचा राजा आलफ्रेड दि ग्रेट ह्यास ड्यानिश लोकांनी 'दे माय धरणी ठाय' असें करून सोडल्यावर अरण्यवासांतील एका झोपड्यांत आश्रय धरून, झोंपडीवाल्या बाईच्या भाकरीवर लक्ष ठेवावे लागले व त्या करपल्या ह्मणून तिचे बोलून घ्यावे लागले. ह्यांत त्याचा खरोखर केवढा बरें अपमान झाला. पण तो सर्व त्याच्या खिजगणतीतही आला नाही, उलटे त्याने तिला इनाम देईन ह्मणून आश्वासन दिले. ही केवळ साधारण प्रतीची गोष्ट झाली. पण केवळ